सूरा अश-शम्स अरबी आणि मराठी

सूरा अश-शम्स संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (15 आयत — مكية). अश-शम्स ऐका, अश-शम्स भाषांतर, अश-शम्स mp3, अश-शम्स pdf.

सूरा अश-शम्स वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
وَالشَّمْسِ وَضُحَاهَا ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची
وَالْقَمَرِ إِذَا تَلَاهَا ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल
وَالنَّهَارِ إِذَا جَلَّاهَا ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील
وَاللَّيْلِ إِذَا يَغْشَاهَا ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील
وَالسَّمَاءِ وَمَا بَنَاهَا ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची
وَالْأَرْضِ وَمَا طَحَاهَا ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची
وَنَفْسٍ وَمَا سَوَّاهَا ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची
فَأَلْهَمَهَا فُجُورَهَا وَتَقْوَاهَا ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची
قَدْ أَفْلَحَ مَن زَكَّاهَا ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला
وَقَدْ خَابَ مَن دَسَّاهَا ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَاهَا ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले
إِذِ انبَعَثَ أَشْقَاهَا ۝١٢
📖 भाषांतर आयत 12
१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला
فَقَالَ لَهُمْ رَسُولُ اللَّهِ نَاقَةَ اللَّهِ وَسُقْيَاهَا ۝١٣
📖 भाषांतर आयत 13
१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा)
فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمْدَمَ عَلَيْهِمْ رَبُّهُم بِذَنبِهِمْ فَسَوَّاهَا ۝١٤
📖 भाषांतर आयत 14
१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले
وَلَا يَخَافُ عُقْبَاهَا ۝١٥
📖 भाषांतर आयत 15
१५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे
← 90 अश-शम्स (91/114) 92 →
वाचा सूरा अश-शम्स मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

91الشمس Ash-Shams 📚 15 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अश-शम्स — 15 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers