आल-इमरान · 39/200
भाषांतर उच्चार — आल-इमरान
فَنَادَتْهُ الْمَلَائِكَةُ وَهُوَ قَائِمٌ يُصَلِّي فِي الْمِحْرَابِ أَنَّ اللَّهَ يُبَشِّرُكَ بِيَحْيَىٰ مُصَدِّقًا بِكَلِمَةٍ مِّنَ اللَّهِ وَسَيِّدًا وَحَصُورًا وَنَبِيًّا مِّنَ الصَّالِحِينَ ٣٩
Transliteration
Fanaadat hul malaaa`ikatu wa huwa qaaa`imuny yusallee fil Mihraabi annal laaha yubashshiruka bi Yahyaa musaddiqam bi Kalimatim minal laahi wa saiyidanw wa hasooranw wa Nabiyyam minas saaliheen
भाषांतर (मराठी अर्थ)
📖 मराठी अर्थ
३९. मग फरिश्त्यांनी हाक मारली जेव्हा ते आपल्या हुजुऱ्यात उभे राहून नमाज पढत होते, की अल्लाह तुम्हाला यहिया (नावाच्या पुत्राचा) शुभ समाचार देतो जो अल्लाहच्या वचना (कलिमा) ची सत्यता सिद्ध करणारा, जनसमूहाचा प्रमुख, अल्लाहचे भय राखून वागणारा आणि पैगंबर असेल, नेक व सदाचारी लोकांपैकी
Additional reference in हिन्दी
🎧 ऐका
📜 आयत 37-41 — आल-इमरान
37فَتَقَبَّلَهَا رَبُّهَا بِقَبُولٍ حَسَنٍ وَأَنبَتَهَا نَبَاتًا حَسَنًا وَكَفَّلَهَا زَكَرِيَّا ۖ كُلَّمَا دَخَلَ عَلَيْهَا زَكَرِيَّا الْمِحْرَابَ وَجَدَ عِندَهَا رِزْقًا ۖ قَالَ يَا مَرْيَمُ أَنَّىٰ لَكِ هَٰذَا ۖ قَالَتْ هُوَ مِنْ عِندِ اللَّهِ ۖ إِنَّ اللَّهَ يَرْزُقُ مَن يَشَاءُ بِغَيْرِ حِسَابٍ
३७. तिला तिच्या पालनकर्त्याने चांगल्या प्रकारे स्वीकारले आणि तिचे सर्वांत उत्तम प्रकारे पालनपोषण करविले, जकरियाला तिचा देखभाल करणारा बनविले. जेव्हा जेव्हा जकरिया मरियमच्या खोलीत (उपासना-कक्षेत) जात तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ अन्न-सामग्री ठेवलेली आढळून येत असे. जकरिया विचारीत की हे मरियम! तुमच्याजवळ ही रोजी (आजिविका) कोठून आली? ती उत्तर देत असे की हे सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या जवळून आहे. निःसंशय, अल्लाह ज्याला इच्छितो अमर्याद रोजी प्रदान करतो
38هُنَالِكَ دَعَا زَكَرِيَّا رَبَّهُ ۖ قَالَ رَبِّ هَبْ لِي مِن لَّدُنكَ ذُرِّيَّةً طَيِّبَةً ۖ إِنَّكَ سَمِيعُ الدُّعَاءِ
३८. त्याच स्थानावर जकरिया यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ- प्रार्थना केली. म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! मला आपल्या जवळून नेक संतान प्रदान कर. निःसंशय, तू दुआ ऐकणारा आहे
39فَنَادَتْهُ الْمَلَائِكَةُ وَهُوَ قَائِمٌ يُصَلِّي فِي الْمِحْرَابِ أَنَّ اللَّهَ يُبَشِّرُكَ بِيَحْيَىٰ مُصَدِّقًا بِكَلِمَةٍ مِّنَ اللَّهِ وَسَيِّدًا وَحَصُورًا وَنَبِيًّا مِّنَ الصَّالِحِينَ
३९. मग फरिश्त्यांनी हाक मारली जेव्हा ते आपल्या हुजुऱ्यात उभे राहून नमाज पढत होते, की अल्लाह तुम्हाला यहिया (नावाच्या पुत्राचा) शुभ समाचार देतो जो अल्लाहच्या वचना (कलिमा) ची सत्यता सिद्ध करणारा, जनसमूहाचा प्रमुख, अल्लाहचे भय राखून वागणारा आणि पैगंबर असेल, नेक व सदाचारी लोकांपैकी
40قَالَ رَبِّ أَنَّىٰ يَكُونُ لِي غُلَامٌ وَقَدْ بَلَغَنِيَ الْكِبَرُ وَامْرَأَتِي عَاقِرٌ ۖ قَالَ كَذَٰلِكَ اللَّهُ يَفْعَلُ مَا يَشَاءُ
४०. जकरिया म्हणू लागले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल? मी खूप म्हातारा झालो आहे आणि माझी पत्नी वांझ आहे. (फरिश्ते) म्हणाले, अशाच प्रकारे अल्लाह जे इच्छितो करतो
41قَالَ رَبِّ اجْعَل لِّي آيَةً ۖ قَالَ آيَتُكَ أَلَّا تُكَلِّمَ النَّاسَ ثَلَاثَةَ أَيَّامٍ إِلَّا رَمْزًا ۗ وَاذْكُر رَّبَّكَ كَثِيرًا وَسَبِّحْ بِالْعَشِيِّ وَالْإِبْكَارِ
४१. जकरिया म्हणाले, हे पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी दे. फर्माविले, निशाणी ही की तीन दिवसपर्यंत तू लोकांशी बोलू शकणार नाहीस, केवळ इशाऱ्यांनी समजावशील. तू आपल्या पालनकर्त्याचे जास्तीतजास्त स्मरण कर, आणि सकाळ-संध्याकाळ त्याची महानता वर्णन कर
आल-इमरानकुराण यादी
200आयत
MedinanRevelation
39आयत
भाषांतर — आल-इमरान 39
सूरा आल-इमरान आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. मग फरिश्त्यांनी हाक मारली जेव्हा ते आपल्या हुजुऱ्यात उभे…सूरा आयत 39/200 — आल-इमरान آل عمران (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: आल-इमरान ऐका, आल-इमरान भाषांतर, आल-इमरान mp3, आल-इमरान pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.
العربية
English
Bahasa Indonesia
Türkçe
Русский
فارسی
Français
اردو
বাংলা
Deutsch
Español
中文
हिन्दी
Português
Italiano
ภาษาไทย
Polski
Nederlands
Shqip
Kiswahili
O'zbek
தமிழ்
Melayu
Bosanski
Soomaali
Azərbaycan
کوردی
한국어
日本語
Svenska
Dansk
Norsk
پښتو
മലയാളം
සිංහල
Tamazight
Hausa
አማርኛ
Български
Тоҷикӣ
Қазақша
Filipino
سنڌي
Yorùbá
Fulfulde
Татарча
ئۇيغۇرچە
Кыргызча
ਪੰਜਾਬੀ
Jawa
తెలుగు
မြန်မာ
ગુજરાતી
Oromo
मराठी
Tiếng Việt
Malagasy
Нохчийн
Wolof
ދިވެހި
ಕನ್ನಡ
Українська
Ελληνικά
ქართული
ខ្មែរ
دری
Qafar af
Maranao
नेपाली
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers








