इब्राहिम · 36/52
भाषांतर उच्चार — इब्राहिम
رَبِّ إِنَّهُنَّ أَضْلَلْنَ كَثِيرًا مِّنَ النَّاسِ ۖ فَمَن تَبِعَنِي فَإِنَّهُ مِنِّي ۖ وَمَنْ عَصَانِي فَإِنَّكَ غَفُورٌ رَّحِيمٌ ۝٣٦
Rabbi innahunna adlalna kaseeram minan naasi faman tabi`anee fa innahoo minnee wa man `asaanee fa innaka Ghafoorur Raheem
📖 मराठी अर्थ
३६. हे माझ्या पालनकर्त्या! त्यांनी अनेक लोकांना सरळ मार्गापासून दूर केले आहे. आता जो माझे अनुसरण करील तो माझा आणि आणि जो अवज्ञा करील तर तू मोठा माफ करणारा व दया करणारा आहे

🎧 ऐका


📜 आयत 34-38 — इब्राहिम

34وَآتَاكُم مِّن كُلِّ مَا سَأَلْتُمُوهُ ۚ وَإِن تَعُدُّوا نِعْمَتَ اللَّهِ لَا تُحْصُوهَا ۗ إِنَّ الْإِنسَانَ لَظَلُومٌ كَفَّارٌ
३४. आणि त्यानेच तुम्हाला तुम्ही मागितलेल्या सर्व वस्तूंपैकी देऊन ठेवल्या आहेत. जर तुम्ही अल्लाहच्या कृपा-देणग्यांची गणना करू इच्छित असाल तर पुरेपूर गणना करूच शकत नाही. निःसंशय मनुष्य मोठा अत्याचारी आणि कृतघ्न आहे
35وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَٰذَا الْبَلَدَ آمِنًا وَاجْنُبْنِي وَبَنِيَّ أَن نَّعْبُدَ الْأَصْنَامَ
३५. (इब्राहीमच्या या दुआ-प्रार्थनेचेही स्मरण करा) जेव्हा इब्राहीम म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! या शहराला शांती-सलामतीचे स्थळ बनव. आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तीपूजा करण्यापासून वाचव
36رَبِّ إِنَّهُنَّ أَضْلَلْنَ كَثِيرًا مِّنَ النَّاسِ ۖ فَمَن تَبِعَنِي فَإِنَّهُ مِنِّي ۖ وَمَنْ عَصَانِي فَإِنَّكَ غَفُورٌ رَّحِيمٌ
३६. हे माझ्या पालनकर्त्या! त्यांनी अनेक लोकांना सरळ मार्गापासून दूर केले आहे. आता जो माझे अनुसरण करील तो माझा आणि आणि जो अवज्ञा करील तर तू मोठा माफ करणारा व दया करणारा आहे
37رَّبَّنَا إِنِّي أَسْكَنتُ مِن ذُرِّيَّتِي بِوَادٍ غَيْرِ ذِي زَرْعٍ عِندَ بَيْتِكَ الْمُحَرَّمِ رَبَّنَا لِيُقِيمُوا الصَّلَاةَ فَاجْعَلْ أَفْئِدَةً مِّنَ النَّاسِ تَهْوِي إِلَيْهِمْ وَارْزُقْهُم مِّنَ الثَّمَرَاتِ لَعَلَّهُمْ يَشْكُرُونَ
३७. हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या काही संततीला या नापीक ओसाड जंगलात तुझ्या पवित्र घराच्या जवळ आबाद केले आहे. हे माझ्या पालनकर्त्या! हे अशासाठी की त्यांनी नमाज कायम करावी, यास्तव तू काही लोकांची मने त्यांच्याकडे आकर्षित कर आणि त्यांना फळांची रोजी (अन्नसामुग्री) प्रदान कर, यासाठी की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी
38رَبَّنَا إِنَّكَ تَعْلَمُ مَا نُخْفِي وَمَا نُعْلِنُ ۗ وَمَا يَخْفَىٰ عَلَى اللَّهِ مِن شَيْءٍ فِي الْأَرْضِ وَلَا فِي السَّمَاءِ
३८. हे आमच्या पालनकर्त्या! तू चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही आम्ही लपवितो आणि जे जाहीर करतो. धरती आणि आकाशातील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही
इब्राहिमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — इब्राहिम 36

सूरा इब्राहिम आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. हे माझ्या पालनकर्त्या! त्यांनी अनेक लोकांना सरळ मार्गापासून दूर…

सूरा आयत 36/52 — इब्राहिम إبراهيم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: इब्राहिम ऐका, इब्राहिम भाषांतर, इब्राहिम mp3, इब्राहिम pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers