अल-अनआम · 71/165
भाषांतर उच्चार — अल-अनआम
قُلْ أَنَدْعُو مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُنَا وَلَا يَضُرُّنَا وَنُرَدُّ عَلَىٰ أَعْقَابِنَا بَعْدَ إِذْ هَدَانَا اللَّهُ كَالَّذِي اسْتَهْوَتْهُ الشَّيَاطِينُ فِي الْأَرْضِ حَيْرَانَ لَهُ أَصْحَابٌ يَدْعُونَهُ إِلَى الْهُدَى ائْتِنَا ۗ قُلْ إِنَّ هُدَى اللَّهِ هُوَ الْهُدَىٰ ۖ وَأُمِرْنَا لِنُسْلِمَ لِرَبِّ الْعَالَمِينَ ۝٧١
Qul anad`oo min doonil laahi maa laa yanfa`unaa wa laa yadurrunaa wa nuraddu `alaaa a`qaabina ba`da iz hadaanal laahu kallazis tahwat hush Shayaateenu fil ardi hairaana lahooo ashaabuny yad`oo nahooo ilal huda` tinaa; qul inna hudal laahi huwal hudaa wa umirnaa linuslima li Rabbil `aalameen
📖 मराठी अर्थ
७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे भले-बुरे काहीच करू शकत नसावा, आणि अल्लाहचे मार्गदर्शन लाभल्यानंतर त्या माणसासारखे टाचा रगडत परत फिरविले जावे, जणू सैतानाने बहकविले असावे आणि तो धरतीवर भटकत फिरत असावा. त्याचे साथीदार त्याला सरळ मार्गाकडे बोलावित असावेत की आमच्या जवळ ये. तुम्ही सांगा, अल्लाहचे मार्गदर्शनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की समस्त जगाच्या स्वामीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करावे
🎧 ऐका

📜 आयत 69-73 — अल-अनआम

69وَمَا عَلَى الَّذِينَ يَتَّقُونَ مِنْ حِسَابِهِم مِّن شَيْءٍ وَلَٰكِن ذِكْرَىٰ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ
६९. आणि जे लोक अल्लाहचे भय राखून वागतात, त्यांच्यावर त्यांच्या पकडीचा काहीच परिणाम होणार नाही. मात्र त्यांना शिकवण देत राहाणे (चांगले आहे) कदाचित तेदेखील अल्लाहचे भय राखून दुष्कर्मापासून दूर राहू लागतील
70وَذَرِ الَّذِينَ اتَّخَذُوا دِينَهُمْ لَعِبًا وَلَهْوًا وَغَرَّتْهُمُ الْحَيَاةُ الدُّنْيَا ۚ وَذَكِّرْ بِهِ أَن تُبْسَلَ نَفْسٌ بِمَا كَسَبَتْ لَيْسَ لَهَا مِن دُونِ اللَّهِ وَلِيٌّ وَلَا شَفِيعٌ وَإِن تَعْدِلْ كُلَّ عَدْلٍ لَّا يُؤْخَذْ مِنْهَا ۗ أُولَٰئِكَ الَّذِينَ أُبْسِلُوا بِمَا كَسَبُوا ۖ لَهُمْ شَرَابٌ مِّنْ حَمِيمٍ وَعَذَابٌ أَلِيمٌ بِمَا كَانُوا يَكْفُرُونَ
७०. आणि अशा लोकांशी कधीही नाते ठेवू नका, ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला खेळ-तमाशा बनवून ठेवले आहे आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात टाकले आहे. आणि या कुरआनाद्वारे उपदेश जरूर करीत राहा, यासाठी की एखादा मनुष्य आपल्या कर्मांमुळे अशा प्रकारे न फसावा की कोणी अल्लाहशिवाय त्याची मदत करणारा नसावा आणि ना शिफारस करणारा आणि अवस्था अशी व्हावी की जर सारे जग भरून मोबदल्यात देऊन टाकील, तरीही त्याच्याकडून घेतले न जावे. ते असेच लोक आहेत की आपल्या कर्मांमुळे अडकून पडले. त्यांच्यासाठी खूप गरम पाणी पिण्याचे असेल आणि त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे मोठी दुःदायक शिक्षा-यातना असेल
71قُلْ أَنَدْعُو مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُنَا وَلَا يَضُرُّنَا وَنُرَدُّ عَلَىٰ أَعْقَابِنَا بَعْدَ إِذْ هَدَانَا اللَّهُ كَالَّذِي اسْتَهْوَتْهُ الشَّيَاطِينُ فِي الْأَرْضِ حَيْرَانَ لَهُ أَصْحَابٌ يَدْعُونَهُ إِلَى الْهُدَى ائْتِنَا ۗ قُلْ إِنَّ هُدَى اللَّهِ هُوَ الْهُدَىٰ ۖ وَأُمِرْنَا لِنُسْلِمَ لِرَبِّ الْعَالَمِينَ
७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे भले-बुरे काहीच करू शकत नसावा, आणि अल्लाहचे मार्गदर्शन लाभल्यानंतर त्या माणसासारखे टाचा रगडत परत फिरविले जावे, जणू सैतानाने बहकविले असावे आणि तो धरतीवर भटकत फिरत असावा. त्याचे साथीदार त्याला सरळ मार्गाकडे बोलावित असावेत की आमच्या जवळ ये. तुम्ही सांगा, अल्लाहचे मार्गदर्शनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की समस्त जगाच्या स्वामीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करावे
72وَأَنْ أَقِيمُوا الصَّلَاةَ وَاتَّقُوهُ ۚ وَهُوَ الَّذِي إِلَيْهِ تُحْشَرُونَ
७२. आणि नमाज कायम करा आणि त्या (अल्लाह) चे भय राखा, तो, तोच आहे, ज्याच्याकडे तुम्ही एकत्रित केले जाल
73وَهُوَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ ۖ وَيَوْمَ يَقُولُ كُن فَيَكُونُ ۚ قَوْلُهُ الْحَقُّ ۚ وَلَهُ الْمُلْكُ يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ ۚ عَالِمُ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ ۚ وَهُوَ الْحَكِيمُ الْخَبِيرُ
७३. त्यानेच आकाशआंना व जमिनीला सत्यासह निर्माण केले, आणि ज्या दिवशी तो फर्माविल, होऊन जा तर होऊन जाईल. त्याचे वचन अगदी सत्य आहे, आणि ज्या दिवशी शंख फुंकला जाईल, राज्य सत्ता त्याचीच असेल. तो जाणणारा आहे परोक्ष आणि अस्तित्वाचा आणितो हिकमतशाली व खबर राखणारा आहे
अल-अनआमकुराण यादी
165आयत
MeccanRevelation
71आयत

भाषांतर — अल-अनआम 71

सूरा अल-अनआम आयत 71 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे…

सूरा आयत 71/165 — अल-अनआम الأنعام (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अनआम ऐका, अल-अनआम भाषांतर, अल-अनआम mp3, अल-अनआम pdf. आयत 69–73. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers