अल-मुम्तहिना · 5/13
भाषांतर उच्चार — अल-मुम्तहिना
رَبَّنَا لَا تَجْعَلْنَا فِتْنَةً لِّلَّذِينَ كَفَرُوا وَاغْفِرْ لَنَا رَبَّنَا ۖ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ۝٥
Rabbana laa taj`alnaa fitnatal lillazeena kafaroo waghfir lanaa rabbanaa innaka antal azeezul hakeem
📖 मराठी अर्थ
५. हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला काफिरांच्या कसोटीत टाकू नको आणि हे आमच्या पालनकर्त्या! आमचे अपराध माफ कर. निःसंशय, तूच वर्चस्वशाली आणि हिकमतशाली आहेस

🎧 ऐका


📜 आयत 3-7 — अल-मुम्तहिना

3لَن تَنفَعَكُمْ أَرْحَامُكُمْ وَلَا أَوْلَادُكُمْ ۚ يَوْمَ الْقِيَامَةِ يَفْصِلُ بَيْنَكُمْ ۚ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
३. तुमचे नातेसंबंध आणि संतती तुम्हाला कयामतच्या दिवशी (काहीच) उपयोगी पडणार नाही. अल्लाह तुमच्या दरम्यान फैसला करील आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे
4قَدْ كَانَتْ لَكُمْ أُسْوَةٌ حَسَنَةٌ فِي إِبْرَاهِيمَ وَالَّذِينَ مَعَهُ إِذْ قَالُوا لِقَوْمِهِمْ إِنَّا بُرَآءُ مِنكُمْ وَمِمَّا تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ كَفَرْنَا بِكُمْ وَبَدَا بَيْنَنَا وَبَيْنَكُمُ الْعَدَاوَةُ وَالْبَغْضَاءُ أَبَدًا حَتَّىٰ تُؤْمِنُوا بِاللَّهِ وَحْدَهُ إِلَّا قَوْلَ إِبْرَاهِيمَ لِأَبِيهِ لَأَسْتَغْفِرَنَّ لَكَ وَمَا أَمْلِكُ لَكَ مِنَ اللَّهِ مِن شَيْءٍ ۖ رَّبَّنَا عَلَيْكَ تَوَكَّلْنَا وَإِلَيْكَ أَنَبْنَا وَإِلَيْكَ الْمَصِيرُ
४. (हे ईमान राखणाऱ्यांनो!) तुमच्याकरिता (हजरत) इब्राहीम आणि त्यांच्या साथीदारांमध्ये फार उत्तम नमुना आहे, जेव्हा त्या सर्वांनी आपल्या जनसमूहाला स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्ही तुमच्यापासून आणि ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज आराधना करता, त्या सर्वांपासून पूर्णपणे विभक्त आहोत. आम्ही तुमच्या (श्रद्धेचा) इन्कार करतो आणि तोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या एक असण्यावर ईमान राखत नाही (तोपर्यंत) आमच्या व तुमच्या दरम्यान नेहमीकरिता कपट आणि शत्रुत्व निर्माण झाले. परंतु इब्राहीम आपल्या पित्यास असे म्हणाले होते की मी तुमच्यासाठी क्षमा-याचना अवश्य करीन आणि तुमच्यासाठी मला अल्लाहसमोर कसलाही अधिकार नाही. हे आमच्या पालनकर्त्या! तुझ्यावरच आम्ही भरवसा राखला आहे१ आणि तुझ्याचकडे आम्ही रुजू होतो, आणि तुझ्याकडेच परतून यायचे आहे
5رَبَّنَا لَا تَجْعَلْنَا فِتْنَةً لِّلَّذِينَ كَفَرُوا وَاغْفِرْ لَنَا رَبَّنَا ۖ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ
५. हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला काफिरांच्या कसोटीत टाकू नको आणि हे आमच्या पालनकर्त्या! आमचे अपराध माफ कर. निःसंशय, तूच वर्चस्वशाली आणि हिकमतशाली आहेस
6لَقَدْ كَانَ لَكُمْ فِيهِمْ أُسْوَةٌ حَسَنَةٌ لِّمَن كَانَ يَرْجُو اللَّهَ وَالْيَوْمَ الْآخِرَ ۚ وَمَن يَتَوَلَّ فَإِنَّ اللَّهَ هُوَ الْغَنِيُّ الْحَمِيدُ
६. निसंशय, तुमच्यासाठी त्या लोकांमध्ये उत्तम आदर्श (आणि चांगले अनुसरण आहे, विशेषतः) त्या प्रत्येक माणसाकरिता, जो अल्लाह आणि कयामतच्या दिवसाच्या भेटीवर विश्वास राखत असेल आणि जर कोणी तोंड फिरविल, तर अल्लाह पूर्णतः निःस्पृह आहे आणि महानता व प्रशंसेस पात्र आहे
7۞ عَسَى اللَّهُ أَن يَجْعَلَ بَيْنَكُمْ وَبَيْنَ الَّذِينَ عَادَيْتُم مِّنْهُم مَّوَدَّةً ۚ وَاللَّهُ قَدِيرٌ ۚ وَاللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ
७. नवल नव्हे की अल्लाहने, लवकरच तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान प्रेम निर्माण करावे.१ अल्लाह सर्व सामर्थ्य बाळगतो आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
अल-मुम्तहिनाकुराण यादी
13आयत
MedinanRevelation
5आयत

भाषांतर — अल-मुम्तहिना 5

सूरा अल-मुम्तहिना आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला काफिरांच्या कसोटीत टाकू नको…

सूरा आयत 5/13 — अल-मुम्तहिना الممتحنة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुम्तहिना ऐका, अल-मुम्तहिना भाषांतर, अल-मुम्तहिना mp3, अल-मुम्तहिना pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers