बनी इस्राईल · 14/111
भाषांतर उच्चार — बनी इस्राईल
اقْرَأْ كِتَابَكَ كَفَىٰ بِنَفْسِكَ الْيَوْمَ عَلَيْكَ حَسِيبًا ۝١٤
Iqra kitaabak kafaa binafsikal Yawma `alaika haseebaa
📖 मराठी अर्थ
१४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू स्वतःच आपला फैसला करण्यास पुरेसा आहे
🎧 ऐका

📜 आयत 12-16 — बनी इस्राईल

12وَجَعَلْنَا اللَّيْلَ وَالنَّهَارَ آيَتَيْنِ ۖ فَمَحَوْنَا آيَةَ اللَّيْلِ وَجَعَلْنَا آيَةَ النَّهَارِ مُبْصِرَةً لِّتَبْتَغُوا فَضْلًا مِّن رَّبِّكُمْ وَلِتَعْلَمُوا عَدَدَ السِّنِينَ وَالْحِسَابَ ۚ وَكُلَّ شَيْءٍ فَصَّلْنَاهُ تَفْصِيلًا
१२. आणि आम्ही रात्र आणि दिवसाला (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले आहे. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशहीन (निस्तेज) केले आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान दाखविणारी बनविले आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध घेऊ शकावे. आणि यासाठीही की वर्षाची गणना आणि हिशोब जाणू शकावे. आणि प्रत्येक विषयाचे आम्ही सविस्तर निवेदन केले आहे
13وَكُلَّ إِنسَانٍ أَلْزَمْنَاهُ طَائِرَهُ فِي عُنُقِهِ ۖ وَنُخْرِجُ لَهُ يَوْمَ الْقِيَامَةِ كِتَابًا يَلْقَاهُ مَنشُورًا
१३. आणि आम्ही माणसाचे चांगले-वाईट त्याच्या गळ्यात टाकले आहे, आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याचा कर्म-लेख बाहेर काढू, जो त्याला आपल्यावर खुला असलेला आढळेल
14اقْرَأْ كِتَابَكَ كَفَىٰ بِنَفْسِكَ الْيَوْمَ عَلَيْكَ حَسِيبًا
१४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू स्वतःच आपला फैसला करण्यास पुरेसा आहे
15مَّنِ اهْتَدَىٰ فَإِنَّمَا يَهْتَدِي لِنَفْسِهِ ۖ وَمَن ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيْهَا ۚ وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۗ وَمَا كُنَّا مُعَذِّبِينَ حَتَّىٰ نَبْعَثَ رَسُولًا
१५. जो मनुष्य मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करतो आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याचे ओझे त्याच्यावरच आहे. कोणीही ओझे बाळगणारा दुसऱ्या कुणाचे ओझे आपल्यावर लादून घेणार नाही आणि आमचा हा नियम नाही की पैगंबर पाठविण्यापूर्वीच अज़ाब (शिक्षा-यातना) पाठवावा
16وَإِذَا أَرَدْنَا أَن نُّهْلِكَ قَرْيَةً أَمَرْنَا مُتْرَفِيهَا فَفَسَقُوا فِيهَا فَحَقَّ عَلَيْهَا الْقَوْلُ فَدَمَّرْنَاهَا تَدْمِيرًا
१६. आणि जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीचा सर्वनाश करण्याचा इरादा करून घेतो तेव्हा तिथल्या सुखवस्तू (सुसंपन्न) लोकांना काही आदेश देतो आणि ते त्या वस्तीत उघडपणे अवज्ञा करू लागतात, तेव्हा त्यांच्यावर (शिक्षा-यातनेचा) फैसला लागू होतो आणि मग आम्ही त्या वस्तीची उलथापालथ करून टाकतो
बनी इस्राईलकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — बनी इस्राईल 14

सूरा बनी इस्राईल आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू…

सूरा आयत 14/111 — बनी इस्राईल الإسراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: बनी इस्राईल ऐका, बनी इस्राईल भाषांतर, बनी इस्राईल mp3, बनी इस्राईल pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers