अल-माइदा · 93/120
भाषांतर उच्चार — अल-माइदा
لَيْسَ عَلَى الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ جُنَاحٌ فِيمَا طَعِمُوا إِذَا مَا اتَّقَوا وَّآمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ ثُمَّ اتَّقَوا وَّآمَنُوا ثُمَّ اتَّقَوا وَّأَحْسَنُوا ۗ وَاللَّهُ يُحِبُّ الْمُحْسِنِينَ ۝٩٣
Laisa `alal lazeena aamanoo wa `amilus saalihaati junaahun feemaa ta`imooo izaa mat taqaw wa aamanoo wa `amilus saalihaati summat taqaw wa aamanoo summat taqaw wa ahsanoo; wallaahu yuhibbul muhsineen
📖 मराठी अर्थ
९३. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, अशांवर गुन्हा नाही जर पूर्वी काही खाल्ले असेल, वस्तुतः नंतर ते परहेजगार (दुष्कर्मापासून दूर राहणारे) बनले, आणि ईमानधारक झाले व सत्कर्म करू लागले, परहेजगारीवर कायम राहिले आणि ईमानावर अटळ राहिले, मग अल्लाहची अवज्ञा करण्यापासून दूर राहिले आणि नेकी (च्या मार्गा) वर चालत राहिले आणि अल्लाह अशा नेक काम करणाऱ्यांशी प्रेम राखतो
🎧 ऐका

📜 आयत 91-95 — अल-माइदा

91إِنَّمَا يُرِيدُ الشَّيْطَانُ أَن يُوقِعَ بَيْنَكُمُ الْعَدَاوَةَ وَالْبَغْضَاءَ فِي الْخَمْرِ وَالْمَيْسِرِ وَيَصُدَّكُمْ عَن ذِكْرِ اللَّهِ وَعَنِ الصَّلَاةِ ۖ فَهَلْ أَنتُم مُّنتَهُونَ
९१. सैतान तर इच्छितोच की मद्य आणि जुगाराद्वारे तुमच्या दरम्यान शत्रूता आणि द्वेष मत्सर निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून व नमाजपासून रोखावे, तेव्हा तुम्ही अशा कामांपासून दूर का राहात नाही
92وَأَطِيعُوا اللَّهَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ وَاحْذَرُوا ۚ فَإِن تَوَلَّيْتُمْ فَاعْلَمُوا أَنَّمَا عَلَىٰ رَسُولِنَا الْبَلَاغُ الْمُبِينُ
९२. आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबरांचे आज्ञापालन करा आणि सावधगिरी पाळा आणि जर तुम्ही तोंड फिरवले तर लक्षात ठेवा की आमच्या पैगंबराची जबाबदारी स्पष्ट संदेश पोहचविण्याची आहे
93لَيْسَ عَلَى الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ جُنَاحٌ فِيمَا طَعِمُوا إِذَا مَا اتَّقَوا وَّآمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ ثُمَّ اتَّقَوا وَّآمَنُوا ثُمَّ اتَّقَوا وَّأَحْسَنُوا ۗ وَاللَّهُ يُحِبُّ الْمُحْسِنِينَ
९३. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, अशांवर गुन्हा नाही जर पूर्वी काही खाल्ले असेल, वस्तुतः नंतर ते परहेजगार (दुष्कर्मापासून दूर राहणारे) बनले, आणि ईमानधारक झाले व सत्कर्म करू लागले, परहेजगारीवर कायम राहिले आणि ईमानावर अटळ राहिले, मग अल्लाहची अवज्ञा करण्यापासून दूर राहिले आणि नेकी (च्या मार्गा) वर चालत राहिले आणि अल्लाह अशा नेक काम करणाऱ्यांशी प्रेम राखतो
94يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَيَبْلُوَنَّكُمُ اللَّهُ بِشَيْءٍ مِّنَ الصَّيْدِ تَنَالُهُ أَيْدِيكُمْ وَرِمَاحُكُمْ لِيَعْلَمَ اللَّهُ مَن يَخَافُهُ بِالْغَيْبِ ۚ فَمَنِ اعْتَدَىٰ بَعْدَ ذَٰلِكَ فَلَهُ عَذَابٌ أَلِيمٌ
९४. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह काही शिकारद्वारे तुमची परीक्षा घेतो, ज्या पर्यंत तुमचे हात आणि तुमचे भाले पोहोचू शकतील, यासाठी की अल्लाहने हे जाणून घ्यावे की कोण त्याला न पाहता भय राखतो जो मनुष्य यानंतरही मर्यादा पार करील, त्याच्यासाठी कठोर सजा आहे
95يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَقْتُلُوا الصَّيْدَ وَأَنتُمْ حُرُمٌ ۚ وَمَن قَتَلَهُ مِنكُم مُّتَعَمِّدًا فَجَزَاءٌ مِّثْلُ مَا قَتَلَ مِنَ النَّعَمِ يَحْكُمُ بِهِ ذَوَا عَدْلٍ مِّنكُمْ هَدْيًا بَالِغَ الْكَعْبَةِ أَوْ كَفَّارَةٌ طَعَامُ مَسَاكِينَ أَوْ عَدْلُ ذَٰلِكَ صِيَامًا لِّيَذُوقَ وَبَالَ أَمْرِهِ ۗ عَفَا اللَّهُ عَمَّا سَلَفَ ۚ وَمَنْ عَادَ فَيَنتَقِمُ اللَّهُ مِنْهُ ۗ وَاللَّهُ عَزِيزٌ ذُو انتِقَامٍ
९५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही (हज किंवा उमराप्रसंगी) एहरामच्या अवस्थेत असाल तर शिकार करू नका आणि तुमच्यापैकी जो कोणी त्याला मारेल तर त्याला फिदिया द्यावा लागेल त्याच्यासारख्याच पाळीव जनावराने, ज्याचा फैसला तुमच्यापैकी दोन न्याय करणारे करतील जे कुर्बानीकरिता काबापर्यंत पोहचविले जाईल किंवा फिदिया म्हणून गरीबांना भोजन द्यावे लागेल किंवा त्याच्या बरोबरीने रोजे (उपवास-व्रत) ठेवावे लागतील, यासाठी की आपल्या कर्माचे फळ चाखावे, जे पूर्वी झाले, अल्लाहने ते माफ केले आणि जो कोणी या (मनाई आदेशा) नंतर पुन्हा असे करील तर अल्लाह त्याचा सूड घेईल, अल्लाह मोठा शक्तिशाली सूड घेणारा आहे
अल-माइदाकुराण यादी
120आयत
MedinanRevelation
93आयत

भाषांतर — अल-माइदा 93

सूरा अल-माइदा आयत 93 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९३. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, अशांवर गुन्हा…

सूरा आयत 93/120 — अल-माइदा المائدة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-माइदा ऐका, अल-माइदा भाषांतर, अल-माइदा mp3, अल-माइदा pdf. आयत 91–95. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers