सूरा अल-अलक pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-अलक pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-अलक भाषांतर. सूरा अल-अलक (Meccan) 19 आयत.
Related
- सूरा अल-अलक भाषांतरमराठी
- सूरा अल-अलक mp3ऐका
- Quran Index मराठी114
More सूरा PDF
सूरा अल-अलक

ﮕﮖﮗﮘﮙﮚ
96:1
१. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले
ﮛﮜﮝﮞﮟ
96:2
२. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले
ﮠﮡﮢﮣ
96:3
३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे
ﮤﮥﮦﮧ
96:4
४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले
ﮨﮩﮪﮫﮬﮭ
96:5
५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता
ﮮﮯﮰﮱﯓ
96:6
६. खरोखर मनुष्य तर स्वतःवर काबू ठेवत नाही
ﯔﯕﯖﯗ
96:7
७. अशासाठी की तो स्वतःला निश्चिंत (किंवा श्रीमंत) समजतो
ﯘﯙﯚﯛﯜ
96:8
८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे
ﯝﯞﯟﯠ
96:9
९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो
ﯡﯢﯣﯤ
96:10
१०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो
ﯥﯦﯧﯨﯩﯪ
96:11
११. आता तुम्हीच सांगा जर तो सन्मार्गावर असेल
ﯫﯬﯭﯮ
96:12
१२. किंवा अल्लाहचे भय राखून वागण्याचा आदेश देत असेल
ﭑﭒﭓﭔﭕ
96:13
१३. बरे पाहा तर, जर हा खोटे ठरवित असेल आणि तोंड फिरवित असेल
ﭖﭗﭘﭙﭚﭛ
96:14
१४. काय हा हे नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहात आहे
ﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
96:15
१५. निश्चितच, जर त्याने आपले वाईट वर्तन सोडले नाही तर आम्ही त्याच्या माथ्यावरचे केस धरून त्याला फरफटत ओढू
ﭣﭤﭥﭦ
96:16
१६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे
ﭧﭨﭩ
96:17
१७. त्याने आपल्या बैठकीतल्या लोकांना बोलावून घ्यावे
ﭪﭫﭬ
96:18
१८. आम्हीही जहन्नमच्या रक्षकांना बोलावून घेऊ
ﭭﭮﭯﭰﭱﭲﭳ
96:19
१९. खबरदार! त्याचे म्हणणे मुळीच मान्य करू नका आणि सजदा करा व (अल्लाहशी) निकट व्हा
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







