बनी इस्राईल · 101/111
भाषांतर उच्चार — सूरा बनी इस्राईल
وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَىٰ تِسْعَ آيَاتٍ بَيِّنَاتٍ ۖ فَاسْأَلْ بَنِي إِسْرَائِيلَ إِذْ جَاءَهُمْ فَقَالَ لَهُ فِرْعَوْنُ إِنِّي لَأَظُنُّكَ يَا مُوسَىٰ مَسْحُورًا ۝١٠١
Wa laqad aatainaa Moosaa tis`a Aayaatim baiyinaatin fas`al Baneee Israaa`eela iz jaaa`ahum faqaala lahoo Fir`awnu inee la azunnuka yaa Moosaa mas hooraa
📖 मराठी अर्थ
१०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ साफ प्रदान केले, तू स्वतः इस्राईलच्या संततीला विचार, जेव्हा ते त्यांच्याजवळ तेव्हा पोहोचले फिरऔन म्हणाला, हे मूसा! माझ्या मते तुझ्यावर जादूटोणा केला गेला आहे

🎧 ऐका


📜 आयत 99-103 — सूरा बनी इस्राईल

99۞ أَوَلَمْ يَرَوْا أَنَّ اللَّهَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ قَادِرٌ عَلَىٰ أَن يَخْلُقَ مِثْلَهُمْ وَجَعَلَ لَهُمْ أَجَلًا لَّا رَيْبَ فِيهِ فَأَبَى الظَّالِمُونَ إِلَّا كُفُورًا
९९. काय त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की ज्या अल्लाहने आकाश आणि धरतीला निर्माण केले, तो त्यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो, त्यानेच त्यांच्यासाठी एक अशी वेळ निश्चित केली आहे, जिच्याबाबत काही शंका नाही, परंतु अत्याचारी लोक कृतघ्न बनल्याविना राहत नाही
100قُل لَّوْ أَنتُمْ تَمْلِكُونَ خَزَائِنَ رَحْمَةِ رَبِّي إِذًا لَّأَمْسَكْتُمْ خَشْيَةَ الْإِنفَاقِ ۚ وَكَانَ الْإِنسَانُ قَتُورًا
१००. त्यांना सांगा की (जर समजा) जर तुम्ही माझ्या पालनकर्त्याच्या दया कृपेच्या खजिन्याचे मालक बनले असते तर तुम्ही त्या वेळीही तो खर्च होईल या भीतीने त्यात कंजूसपणा केला असता आणि मनुष्य आहेच मोठा कोत्या मनाचा
101وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَىٰ تِسْعَ آيَاتٍ بَيِّنَاتٍ ۖ فَاسْأَلْ بَنِي إِسْرَائِيلَ إِذْ جَاءَهُمْ فَقَالَ لَهُ فِرْعَوْنُ إِنِّي لَأَظُنُّكَ يَا مُوسَىٰ مَسْحُورًا
१०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ साफ प्रदान केले, तू स्वतः इस्राईलच्या संततीला विचार, जेव्हा ते त्यांच्याजवळ तेव्हा पोहोचले फिरऔन म्हणाला, हे मूसा! माझ्या मते तुझ्यावर जादूटोणा केला गेला आहे
102قَالَ لَقَدْ عَلِمْتَ مَا أَنزَلَ هَٰؤُلَاءِ إِلَّا رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ بَصَائِرَ وَإِنِّي لَأَظُنُّكَ يَا فِرْعَوْنُ مَثْبُورًا
१०२. (मूसाने) उत्तर दिले, हे मला माहीत झाले आहे की आकाशांच्या आणि धरतीच्या पालनकर्त्यानेच हे चमत्कार दाखविण्यासाठी व समजाविण्यासाठी अवतरित केले आहेत, हे फिरऔन! मला तर वाटते की तू नक्कीच नष्ट केला गेला आहे
103فَأَرَادَ أَن يَسْتَفِزَّهُم مِّنَ الْأَرْضِ فَأَغْرَقْنَاهُ وَمَن مَّعَهُ جَمِيعًا
१०३. शेवटी फिरऔनने पक्का इरादा केला की त्यांना भूमीतूनच काढून फेकावे, तेव्हा आम्ही स्वतः त्याला आणि त्याच्या सर्व साथीदारांना बुडवून टाकले
बनी इस्राईलकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
101आयत

भाषांतर — बनी इस्राईल 101

सूरा बनी इस्राईल आयत 101 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ…

सूरा आयत 101/111 — सूरा बनी इस्राईल الإسراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा बनी इस्राईल ऐका, सूरा बनी इस्राईल भाषांतर, सूरा बनी इस्राईल mp3, सूरा बनी इस्राईल pdf. आयत 99–103. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers