अन-निसा · 124/176
भाषांतर उच्चार — अन-निसा
وَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ مِن ذَكَرٍ أَوْ أُنثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ فَأُولَٰئِكَ يَدْخُلُونَ الْجَنَّةَ وَلَا يُظْلَمُونَ نَقِيرًا ۝١٢٤
Wa mai ya`mal minas saalihaati min zakarin aw unsaa wa huwa mu`minun fa ulaaa`ika yadkhuloonal Jannata wa laa yuzlamoona naqeeraa
📖 मराठी अर्थ
१२४. आणि जो ईमानधारक असेल, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो नेक आचरण करील, निःसंशय असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिळाइतकाही त्याचा हक्क मारला जाणार नाही
🎧 ऐका

📜 आयत 122-126 — अन-निसा

122وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ سَنُدْخِلُهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ۖ وَعْدَ اللَّهِ حَقًّا ۚ وَمَنْ أَصْدَقُ مِنَ اللَّهِ قِيلًا
१२२. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, आणि सत्कर्म केले आम्ही त्यांना त्या जन्नतीमध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत. जिथे ते नेहमी नेहमी राहतील. हा अल्लाहचा वायदा आहे जो निःसंशय खरा आहे. आणि अल्लाहपेक्षा, आपल्या कथनात सच्चा आणखी कोण असू शकतो
123لَّيْسَ بِأَمَانِيِّكُمْ وَلَا أَمَانِيِّ أَهْلِ الْكِتَابِ ۗ مَن يَعْمَلْ سُوءًا يُجْزَ بِهِ وَلَا يَجِدْ لَهُ مِن دُونِ اللَّهِ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا
१२३. तुमच्या इच्छा-आकांक्षांनी आणि ग्रंथधारकांच्या इच्छा-आकांक्षांनी काहीही होणार नाही. जो वाईट कर्म करील, त्याची शिक्षा तो प्राप्त करील आणि त्याला अल्लाहखेरीज आपला कोणी मित्र आणि मदत करणारा आढळणार नाही
124وَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ مِن ذَكَرٍ أَوْ أُنثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ فَأُولَٰئِكَ يَدْخُلُونَ الْجَنَّةَ وَلَا يُظْلَمُونَ نَقِيرًا
१२४. आणि जो ईमानधारक असेल, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो नेक आचरण करील, निःसंशय असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिळाइतकाही त्याचा हक्क मारला जाणार नाही
125وَمَنْ أَحْسَنُ دِينًا مِّمَّنْ أَسْلَمَ وَجْهَهُ لِلَّهِ وَهُوَ مُحْسِنٌ وَاتَّبَعَ مِلَّةَ إِبْرَاهِيمَ حَنِيفًا ۗ وَاتَّخَذَ اللَّهُ إِبْرَاهِيمَ خَلِيلًا
१२५. आणि दीन-धर्म संदर्भात त्याहून चांगला कोण असू शकतो, जो अल्लाहकरिता पूर्णतः आत्मसमर्पण करील आणि तो नेक-सदाचारीही असेल आणि इब्राहीमच्या दीन-धर्माचे अनुसरण केलेला असेल जे एकाग्र होते आणि इब्राहीमला अल्लाहने आपला मित्र बनविले आहे
126وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۚ وَكَانَ اللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ مُّحِيطًا
१२६. आणि जे काही आकाशांमध्ये, आणि जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाहने प्रत्येक चीज-वस्तूला आपल्या घेऱ्यात घेतले आहे
अन-निसाकुराण यादी
176आयत
MedinanRevelation
124आयत

भाषांतर — अन-निसा 124

सूरा अन-निसा आयत 124 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२४. आणि जो ईमानधारक असेल, मग तो पुरुष असो किंवा…

सूरा आयत 124/176 — अन-निसा النساء (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-निसा ऐका, अन-निसा भाषांतर, अन-निसा mp3, अन-निसा pdf. आयत 122–126. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers