अल-माइदा · 65/120
भाषांतर उच्चार — अल-माइदा
وَلَوْ أَنَّ أَهْلَ الْكِتَابِ آمَنُوا وَاتَّقَوْا لَكَفَّرْنَا عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ وَلَأَدْخَلْنَاهُمْ جَنَّاتِ النَّعِيمِ ۝٦٥
Wa law anna Ahlal Kitaabi aamanoo wattaqaw lakaffarnaa `anhum saiyiaatihim wa la adkhalnaahu Jannaatin Na`eem
📖 मराठी अर्थ
६५. आणि जर या ग्रंथधारकांनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर आम्ही त्यांच्या दुष्कृत्यांवर पडदा टाकला असता आणि निश्चितच त्यांना कृपा देणग्यांनी भरलेल्या जन्नतमध्ये दाखल केले असते
🎧 ऐका

📜 आयत 63-67 — अल-माइदा

63لَوْلَا يَنْهَاهُمُ الرَّبَّانِيُّونَ وَالْأَحْبَارُ عَن قَوْلِهِمُ الْإِثْمَ وَأَكْلِهِمُ السُّحْتَ ۚ لَبِئْسَ مَا كَانُوا يَصْنَعُونَ
६३. त्यांना त्यांचे संत-महंत आणि धर्मज्ञानी लोक खोटे बोलण्यापासून आणि हराम (अवैध) खाण्यापासून रोखत का नाही? निःसंशय ही वाईट कर्मे आहेत, जी हे करीत आहेत
64وَقَالَتِ الْيَهُودُ يَدُ اللَّهِ مَغْلُولَةٌ ۚ غُلَّتْ أَيْدِيهِمْ وَلُعِنُوا بِمَا قَالُوا ۘ بَلْ يَدَاهُ مَبْسُوطَتَانِ يُنفِقُ كَيْفَ يَشَاءُ ۚ وَلَيَزِيدَنَّ كَثِيرًا مِّنْهُم مَّا أُنزِلَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ طُغْيَانًا وَكُفْرًا ۚ وَأَلْقَيْنَا بَيْنَهُمُ الْعَدَاوَةَ وَالْبَغْضَاءَ إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ ۚ كُلَّمَا أَوْقَدُوا نَارًا لِّلْحَرْبِ أَطْفَأَهَا اللَّهُ ۚ وَيَسْعَوْنَ فِي الْأَرْضِ فَسَادًا ۚ وَاللَّهُ لَا يُحِبُّ الْمُفْسِدِينَ
६४. आणि यहूदी म्हणाले, अल्लाहचा हात बांधलेला आहे, (उलट) त्यांचेच हात बांधलेले आहेत आणि त्यांच्या या कथनामुळे त्यांचा धिःक्कार केला गेला. किंबहुना अल्लाहचे दोन्ही हात खुले आहेत. ज्याप्रकारे इच्छितो, खर्च करतो, आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले आहे, ते त्यांच्यापैकी बहुतेकांच्या विद्रोह आणि इन्कारात वाढकरते, आणि आम्ही त्यांच्यात आपसात कयामतापर्यंत शत्रूता आणि द्वेष मत्सर पेरले आहे. ते जेव्हा जेव्हा युद्धाची आग भडकवू इच्छितात, अल्लाह तिला विझवितो. हे जमिनीवर दहशत आणि उत्पाद माजवित फिरतात आणि अल्लाह अशा विध्वंस करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही
65وَلَوْ أَنَّ أَهْلَ الْكِتَابِ آمَنُوا وَاتَّقَوْا لَكَفَّرْنَا عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ وَلَأَدْخَلْنَاهُمْ جَنَّاتِ النَّعِيمِ
६५. आणि जर या ग्रंथधारकांनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर आम्ही त्यांच्या दुष्कृत्यांवर पडदा टाकला असता आणि निश्चितच त्यांना कृपा देणग्यांनी भरलेल्या जन्नतमध्ये दाखल केले असते
66وَلَوْ أَنَّهُمْ أَقَامُوا التَّوْرَاةَ وَالْإِنجِيلَ وَمَا أُنزِلَ إِلَيْهِم مِّن رَّبِّهِمْ لَأَكَلُوا مِن فَوْقِهِمْ وَمِن تَحْتِ أَرْجُلِهِم ۚ مِّنْهُمْ أُمَّةٌ مُّقْتَصِدَةٌ ۖ وَكَثِيرٌ مِّنْهُمْ سَاءَ مَا يَعْمَلُونَ
६६. जर त्यांनी तौरात आणि इंजील आणि त्या धर्मशास्त्रांचे पालन केले असते जे त्यांच्याकडे, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेलेत तर त्यांना आपल्या वरूनही आणि पायाखालूनही भरपूर (अन्नसामग्री) खायला लाभले असते. त्याच्याताला एक समूह मधल्या मार्गावर आहे, मात्र अधिकांश दुराचारी आहेत
67۞ يَا أَيُّهَا الرَّسُولُ بَلِّغْ مَا أُنزِلَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ ۖ وَإِن لَّمْ تَفْعَلْ فَمَا بَلَّغْتَ رِسَالَتَهُ ۚ وَاللَّهُ يَعْصِمُكَ مِنَ النَّاسِ ۗ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْكَافِرِينَ
६७. हे पैगंबर! तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे जो (संदेश) उतरविला गेला आहे, तो लोकांपर्यंत पोहचवा. जर तुम्ही असे केले नाही, तर त्याच्या संदेशाचा हक्क अदा केला नाही आणि अल्लाह लोकांपासून तुमचे रक्षण करील निःसंशय अल्लाह इन्कारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही
अल-माइदाकुराण यादी
120आयत
MedinanRevelation
65आयत

भाषांतर — अल-माइदा 65

सूरा अल-माइदा आयत 65 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६५. आणि जर या ग्रंथधारकांनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे…

सूरा आयत 65/120 — अल-माइदा المائدة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-माइदा ऐका, अल-माइदा भाषांतर, अल-माइदा mp3, अल-माइदा pdf. आयत 63–67. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers