फातिर · 10/45
भाषांतर उच्चार — सूरा फातिर
مَن كَانَ يُرِيدُ الْعِزَّةَ فَلِلَّهِ الْعِزَّةُ جَمِيعًا ۚ إِلَيْهِ يَصْعَدُ الْكَلِمُ الطَّيِّبُ وَالْعَمَلُ الصَّالِحُ يَرْفَعُهُ ۚ وَالَّذِينَ يَمْكُرُونَ السَّيِّئَاتِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ ۖ وَمَكْرُ أُولَٰئِكَ هُوَ يَبُورُ ۝١٠
Man kaana yureedul `izzata falillaahil `izzatu jamee`aa; ilaihi yas`adul kalimut taiyibu wal`amalus saalihu yarfa`uh; wallazeena yamkuroonas sayyiaati lahum `azaabun shadeed; wa makru ulaaa`ika huwa yaboor
📖 मराठी अर्थ
१०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे. समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा फातिर

8أَفَمَن زُيِّنَ لَهُ سُوءُ عَمَلِهِ فَرَآهُ حَسَنًا ۖ فَإِنَّ اللَّهَ يُضِلُّ مَن يَشَاءُ وَيَهْدِي مَن يَشَاءُ ۖ فَلَا تَذْهَبْ نَفْسُكَ عَلَيْهِمْ حَسَرَاتٍ ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ بِمَا يَصْنَعُونَ
८. काय तो मनुष्य, ज्याच्याकरिता त्याची दुष्कर्मे सुशोभित केली गेली आहेत तर तो त्यां (कर्मां) ना चांगले समजतो (काय तो मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या माणसा समान आहे?) (निश्चितच) अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो मार्ग दाखवितो. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल दुःखी कष्टी होऊन आपला जीव कष्ट यातनेत टाकू नये. हे लोक जे काही करीत आहेत निःसंशय, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
9وَاللَّهُ الَّذِي أَرْسَلَ الرِّيَاحَ فَتُثِيرُ سَحَابًا فَسُقْنَاهُ إِلَىٰ بَلَدٍ مَّيِّتٍ فَأَحْيَيْنَا بِهِ الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ كَذَٰلِكَ النُّشُورُ
९. आणि अल्लाहच वाऱ्यांना वाढवितो, जे ढगांना उंच नेतात, मग आम्ही त्या ढगांना कोरड्या जमिनीकडे नेतो आणि त्याद्वारे त्या जमिनीला तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठणेही आहे
10مَن كَانَ يُرِيدُ الْعِزَّةَ فَلِلَّهِ الْعِزَّةُ جَمِيعًا ۚ إِلَيْهِ يَصْعَدُ الْكَلِمُ الطَّيِّبُ وَالْعَمَلُ الصَّالِحُ يَرْفَعُهُ ۚ وَالَّذِينَ يَمْكُرُونَ السَّيِّئَاتِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ ۖ وَمَكْرُ أُولَٰئِكَ هُوَ يَبُورُ
१०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे. समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल
11وَاللَّهُ خَلَقَكُم مِّن تُرَابٍ ثُمَّ مِن نُّطْفَةٍ ثُمَّ جَعَلَكُمْ أَزْوَاجًا ۚ وَمَا تَحْمِلُ مِنْ أُنثَىٰ وَلَا تَضَعُ إِلَّا بِعِلْمِهِ ۚ وَمَا يُعَمَّرُ مِن مُّعَمَّرٍ وَلَا يُنقَصُ مِنْ عُمُرِهِ إِلَّا فِي كِتَابٍ ۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرٌ
११. लोक हो! अल्लाहने तुम्हाल मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग तुम्हाला जोडी (जोडपे नर-नारी) बनविले. स्त्रियांचे गर्भ धारण करणे आणि बाळाचे जन्म घेणे, या सर्वांचे त्याला ज्ञान आहे, आणि कोणताही आयुष्यमान दीर्घायुष्य प्राप्त करीत नाही आणि ना कोणाचे आयुष्य घडते, परंतु हे सर्व एका ग्रंथात अस्तित्वात आहे. अल्लाकरिता ही गोष्ट फार सोपी आहे
12وَمَا يَسْتَوِي الْبَحْرَانِ هَٰذَا عَذْبٌ فُرَاتٌ سَائِغٌ شَرَابُهُ وَهَٰذَا مِلْحٌ أُجَاجٌ ۖ وَمِن كُلٍّ تَأْكُلُونَ لَحْمًا طَرِيًّا وَتَسْتَخْرِجُونَ حِلْيَةً تَلْبَسُونَهَا ۖ وَتَرَى الْفُلْكَ فِيهِ مَوَاخِرَ لِتَبْتَغُوا مِن فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ
१२. आणि दोन समुद्र समान नाहीत. हा गोड आहे, तहान भागवितो, प्यायला चांगला आणि तो दुसरा खारट आहे, कडू. तुम्ही या दोघांपासून ताजे मांस खाता आणि ते दागिने काढता, ज्यांना तुम्ही अंगावर घालता आणि तुम्ही पाहता की मोठमोठ्या नावा, पाण्याला छेदणाऱ्या, त्या समुद्रात आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याचे आभार मानावेत
फातिरकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — फातिर 10

सूरा फातिर आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने…

सूरा आयत 10/45 — सूरा फातिर فاطر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा फातिर ऐका, सूरा फातिर भाषांतर, सूरा फातिर mp3, सूरा फातिर pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers