बनी इस्राईल · 23/111
भाषांतर उच्चार — सूरा बनी इस्राईल
۞ وَقَضَىٰ رَبُّكَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا ۚ إِمَّا يَبْلُغَنَّ عِندَكَ الْكِبَرَ أَحَدُهُمَا أَوْ كِلَاهُمَا فَلَا تَقُل لَّهُمَا أُفٍّ وَلَا تَنْهَرْهُمَا وَقُل لَّهُمَا قَوْلًا كَرِيمًا ۝٢٣
Wa qadaa Rabbuka allaa ta`budooo illaaa iyyaahu wa bilwaalidaini ihsaanaa; immaa yablughanna `indakal kibara ahaduhumaaa aw kilaahumaa falaa taqul lahumaaa uffinw wa laa tanharhumaa wa qullahumaa qawlan kareemaa
📖 मराठी अर्थ
२३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्‌व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा बनी इस्राईल

21انظُرْ كَيْفَ فَضَّلْنَا بَعْضَهُمْ عَلَىٰ بَعْضٍ ۚ وَلَلْآخِرَةُ أَكْبَرُ دَرَجَاتٍ وَأَكْبَرُ تَفْضِيلًا
२१. पाहा, त्यांच्यात एकाला एकावर कशा प्रकारे श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) तर दर्जाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आणि श्रेष्ठतेच्या दृष्टीनेही फारच उत्तम आहे
22لَّا تَجْعَلْ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَتَقْعُدَ مَذْمُومًا مَّخْذُولًا
२२. अल्लाहसोबत दुसऱ्या कुणाला उपास्य बनवू नका की शेवटी तुम्ही अपमानित, असहाय्य होऊन बसाल
23۞ وَقَضَىٰ رَبُّكَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا ۚ إِمَّا يَبْلُغَنَّ عِندَكَ الْكِبَرَ أَحَدُهُمَا أَوْ كِلَاهُمَا فَلَا تَقُل لَّهُمَا أُفٍّ وَلَا تَنْهَرْهُمَا وَقُل لَّهُمَا قَوْلًا كَرِيمًا
२३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्‌व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा
24وَاخْفِضْ لَهُمَا جَنَاحَ الذُّلِّ مِنَ الرَّحْمَةِ وَقُل رَّبِّ ارْحَمْهُمَا كَمَا رَبَّيَانِي صَغِيرًا
२४. आणि नरमी व प्रेमासह त्यांच्यासमोर विनम्रतापूर्वक हात पसरवून ठेवा१ आणि दुआ-प्रार्थना करीत राहा, हे माझ्या पालनकर्त्या! यांच्यावर अशीच दया कर जशी यांनी माझ्या बालपणात माझे पालनपोषण करण्यात केली आहे
25رَّبُّكُمْ أَعْلَمُ بِمَا فِي نُفُوسِكُمْ ۚ إِن تَكُونُوا صَالِحِينَ فَإِنَّهُ كَانَ لِلْأَوَّابِينَ غَفُورًا
२५. जे काही तुमच्या हृदयात आहे ते तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो. जर तुम्ही नेक सदाचारी असाल तर तो क्षमा-याचना करणाऱ्यांना माफ करणारा आहे
बनी इस्राईलकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — बनी इस्राईल 23

सूरा बनी इस्राईल आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही…

सूरा आयत 23/111 — सूरा बनी इस्राईल الإسراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा बनी इस्राईल ऐका, सूरा बनी इस्राईल भाषांतर, सूरा बनी इस्राईल mp3, सूरा बनी इस्राईल pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers