अल-बकरा · 60/286
भाषांतर उच्चार — सूरा अल-बकरा
۞ وَإِذِ اسْتَسْقَىٰ مُوسَىٰ لِقَوْمِهِ فَقُلْنَا اضْرِب بِّعَصَاكَ الْحَجَرَ ۖ فَانفَجَرَتْ مِنْهُ اثْنَتَا عَشْرَةَ عَيْنًا ۖ قَدْ عَلِمَ كُلُّ أُنَاسٍ مَّشْرَبَهُمْ ۖ كُلُوا وَاشْرَبُوا مِن رِّزْقِ اللَّهِ وَلَا تَعْثَوْا فِي الْأَرْضِ مُفْسِدِينَ ۝٦٠
Wa izis tasqaa Moosaa liqawmihee faqulnad rib bi`asaakal hajara fanfajarat minhusnataaa `ashrata `aynan qad `alima kullu unaasim mash rabahum kuloo washraboo mir rizqil laahi wa laa ta`saw fil ardi mufsideen
📖 मराठी अर्थ
६०. आणि जेव्हा मूसाने आपल्या जनसमूहाच्या लोकांकरिता पाणी मागितले तेव्हा आम्ही फर्माविले की आपली काठी दगडावर मारा, ज्यातून बारा स्रोत (झरे) फुटून वाहू लागले. प्रत्येक समूहाने आपापला स्रोत जाणून घेतला (आणि आम्ही फर्माविले की) अल्लाहने प्रदान केलेली अन्नसामग्री खा व प्या आणि धरतीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 58-62 — सूरा अल-बकरा

58وَإِذْ قُلْنَا ادْخُلُوا هَٰذِهِ الْقَرْيَةَ فَكُلُوا مِنْهَا حَيْثُ شِئْتُمْ رَغَدًا وَادْخُلُوا الْبَابَ سُجَّدًا وَقُولُوا حِطَّةٌ نَّغْفِرْ لَكُمْ خَطَايَاكُمْ ۚ وَسَنَزِيدُ الْمُحْسِنِينَ
५८. आणि आम्ही तुम्हाला फर्माविले की त्या वस्तीत जा १ आणि जे काही, ज्या ठिकाणाहून इच्छा होईल मनसोक्त खा व प्या आणि दरवाजातून डोके नमवून दाखल व्हा २ आणि तोंडाने म्हणत जा, आम्ही क्षमा याचना करतो.३ आम्ही तुमचे अपराध माफ करू आणि भलाई करणाऱ्यांना आणखी जास्त प्रदान करू
59فَبَدَّلَ الَّذِينَ ظَلَمُوا قَوْلًا غَيْرَ الَّذِي قِيلَ لَهُمْ فَأَنزَلْنَا عَلَى الَّذِينَ ظَلَمُوا رِجْزًا مِّنَ السَّمَاءِ بِمَا كَانُوا يَفْسُقُونَ
५९. मग त्या अत्याचारी लोकांनी, ही गोष्ट, जी त्यांना सांगितली गेली, बदलून टाकली. (परिणामी) आम्हीही त्या अत्याचारी लोकांवर त्यांच्या आज्ञाभंगामुळे आकाशातून अज़ाब (शिक्षा यातना) अवतरीत केला
60۞ وَإِذِ اسْتَسْقَىٰ مُوسَىٰ لِقَوْمِهِ فَقُلْنَا اضْرِب بِّعَصَاكَ الْحَجَرَ ۖ فَانفَجَرَتْ مِنْهُ اثْنَتَا عَشْرَةَ عَيْنًا ۖ قَدْ عَلِمَ كُلُّ أُنَاسٍ مَّشْرَبَهُمْ ۖ كُلُوا وَاشْرَبُوا مِن رِّزْقِ اللَّهِ وَلَا تَعْثَوْا فِي الْأَرْضِ مُفْسِدِينَ
६०. आणि जेव्हा मूसाने आपल्या जनसमूहाच्या लोकांकरिता पाणी मागितले तेव्हा आम्ही फर्माविले की आपली काठी दगडावर मारा, ज्यातून बारा स्रोत (झरे) फुटून वाहू लागले. प्रत्येक समूहाने आपापला स्रोत जाणून घेतला (आणि आम्ही फर्माविले की) अल्लाहने प्रदान केलेली अन्नसामग्री खा व प्या आणि धरतीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका
61وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَىٰ لَن نَّصْبِرَ عَلَىٰ طَعَامٍ وَاحِدٍ فَادْعُ لَنَا رَبَّكَ يُخْرِجْ لَنَا مِمَّا تُنبِتُ الْأَرْضُ مِن بَقْلِهَا وَقِثَّائِهَا وَفُومِهَا وَعَدَسِهَا وَبَصَلِهَا ۖ قَالَ أَتَسْتَبْدِلُونَ الَّذِي هُوَ أَدْنَىٰ بِالَّذِي هُوَ خَيْرٌ ۚ اهْبِطُوا مِصْرًا فَإِنَّ لَكُم مَّا سَأَلْتُمْ ۗ وَضُرِبَتْ عَلَيْهِمُ الذِّلَّةُ وَالْمَسْكَنَةُ وَبَاءُوا بِغَضَبٍ مِّنَ اللَّهِ ۗ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ كَانُوا يَكْفُرُونَ بِآيَاتِ اللَّهِ وَيَقْتُلُونَ النَّبِيِّينَ بِغَيْرِ الْحَقِّ ۗ ذَٰلِكَ بِمَا عَصَوا وَّكَانُوا يَعْتَدُونَ
६१. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले, हे मूसा! आम्हाला एकाच प्रकारच्या जेवणाने धीर-संयम राखला जाणार नाही, यास्तव आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ-प्रार्थना करा की त्याने आम्हाला जमिनीतून उत्पन्न झालेली भाजी, काकडी, गहू, मसूर आणि कांदा द्यावा. मूसा म्हणाले की उत्तम वस्तूंऐवजी तुच्छ वस्तू का मागता? मग तर एखाद्या शहरात जा, तिथे तुम्हाला तुमच्या पसंतीच्या या सर्व चीज-वस्तू मिळतील. त्यांच्यावर अपमान आणि दुर्दशा टाकली गेली आणि ते अल्लाहचा अज़ाब (प्रकोप) घेऊन परतले. हे अशासाठी की ते अल्लाहच्या आयतींना मानत नव्हते, आणि पैगंबरांची नाहक हत्या करीत होते. त्यांच्या जुलूम अतिरेकाचा हा परिणाम होय
62إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَالَّذِينَ هَادُوا وَالنَّصَارَىٰ وَالصَّابِئِينَ مَنْ آمَنَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَعَمِلَ صَالِحًا فَلَهُمْ أَجْرُهُمْ عِندَ رَبِّهِمْ وَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ
६२. निःसंशय, जो मुस्लिम असो, यहूदी (ज्यू) असो, नसारा (ख्रिश्चन) असो किंवा साबी १ असो, जो कोणी सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि कयामतीच्या दिवसावर ईमान राखील आणि सत्कर्मे करील तर त्याचा मोबदला त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसलेही भय राहील, आणि ना कसले दुःख राहील
अल-बकराकुराण यादी
286आयत
MedinanRevelation
60आयत

भाषांतर — अल-बकरा 60

सूरा अल-बकरा आयत 60 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६०. आणि जेव्हा मूसाने आपल्या जनसमूहाच्या लोकांकरिता पाणी मागितले तेव्हा…

सूरा आयत 60/286 — सूरा अल-बकरा البقرة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बकरा ऐका, सूरा अल-बकरा भाषांतर, सूरा अल-बकरा mp3, सूरा अल-बकरा pdf. आयत 58–62. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers