अल-अंबिया · 89/112
भाषांतर उच्चार — अल-अंबिया
وَزَكَرِيَّا إِذْ نَادَىٰ رَبَّهُ رَبِّ لَا تَذَرْنِي فَرْدًا وَأَنتَ خَيْرُ الْوَارِثِينَ ۝٨٩
Wa Zakariyyaaa iz naadaa Rabbahoo Rabbi laa tazarnee fardanw wa Anta khairul waariseen
📖 मराठी अर्थ
८९. आणि जकरियाचे (स्मरण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! मला तू एकटा सोडू नको. तू सर्वांत उत्तम वारस आहेस
🎧 ऐका

📜 आयत 87-91 — अल-अंबिया

87وَذَا النُّونِ إِذ ذَّهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فَنَادَىٰ فِي الظُّلُمَاتِ أَن لَّا إِلَٰهَ إِلَّا أَنتَ سُبْحَانَكَ إِنِّي كُنتُ مِنَ الظَّالِمِينَ
८७. आणि मासळीवाल्या (यूनुस अलै.) ची (आठवण करा) जेव्हा ते नाराज होऊन निघून गेले आणि असे समजत होते की आम्ही त्यांना धरणार नाही. शेवटी त्यांनी त्या अंधारांमधून पुकारले, हे उपासनीय (अल्लाह)! तुझ्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तू पवित्र आहेस. निश्चितच मी अत्याचारी लोकांपैकी आहे
88فَاسْتَجَبْنَا لَهُ وَنَجَّيْنَاهُ مِنَ الْغَمِّ ۚ وَكَذَٰلِكَ نُنجِي الْمُؤْمِنِينَ
८८. तेव्हा आम्ही त्यांची पुकार (विनंती) मान्य केली आणि त्यांना दुःखातून मुक्त केले आणि आम्ही अशा प्रकारे ईमान राखणाऱ्यांना वाचवितो
89وَزَكَرِيَّا إِذْ نَادَىٰ رَبَّهُ رَبِّ لَا تَذَرْنِي فَرْدًا وَأَنتَ خَيْرُ الْوَارِثِينَ
८९. आणि जकरियाचे (स्मरण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! मला तू एकटा सोडू नको. तू सर्वांत उत्तम वारस आहेस
90فَاسْتَجَبْنَا لَهُ وَوَهَبْنَا لَهُ يَحْيَىٰ وَأَصْلَحْنَا لَهُ زَوْجَهُ ۚ إِنَّهُمْ كَانُوا يُسَارِعُونَ فِي الْخَيْرَاتِ وَيَدْعُونَنَا رَغَبًا وَرَهَبًا ۖ وَكَانُوا لَنَا خَاشِعِينَ
९०. तेव्हा आम्ही त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्यांना यहया (नावाचा पुत्र) प्रदान केला, आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्यासाठी यथायोग्य बनविले. हे नेक- सदाचारी लोक सत्कर्मांकडे लवकर धाव घेत, आणि आम्हाला मोठ्या आवडीने भय राखून पुकारत असत, आणि आमच्या समोर मोठ्या नम्रतेने राहात असत
91وَالَّتِي أَحْصَنَتْ فَرْجَهَا فَنَفَخْنَا فِيهَا مِن رُّوحِنَا وَجَعَلْنَاهَا وَابْنَهَا آيَةً لِّلْعَالَمِينَ
९१. आणि ती (सत्शील स्त्री) जिने आपल्या शील-अब्रुचे रक्षण केले, आम्ही तिच्यात आपला आत्मा फुंकला आणि स्वतः तिला आणि तिच्या पुत्राला साऱ्या जगाकरिता निशाणी (चिन्ह) बनविले
अल-अंबियाकुराण यादी
112आयत
MeccanRevelation
89आयत

भाषांतर — अल-अंबिया 89

सूरा अल-अंबिया आयत 89 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८९. आणि जकरियाचे (स्मरण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ…

सूरा आयत 89/112 — अल-अंबिया الأنبياء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अंबिया ऐका, अल-अंबिया भाषांतर, अल-अंबिया mp3, अल-अंबिया pdf. आयत 87–91. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers