आल-इमरान · 77/200
भाषांतर उच्चार — सूरा आल-इमरान
إِنَّ الَّذِينَ يَشْتَرُونَ بِعَهْدِ اللَّهِ وَأَيْمَانِهِمْ ثَمَنًا قَلِيلًا أُولَٰئِكَ لَا خَلَاقَ لَهُمْ فِي الْآخِرَةِ وَلَا يُكَلِّمُهُمُ اللَّهُ وَلَا يَنظُرُ إِلَيْهِمْ يَوْمَ الْقِيَامَةِ وَلَا يُزَكِّيهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ ۝٧٧
Innal lazeena yashtaroona bi`ahdil laahi wa aymaanihim samanan qaleelan ulaaa`ika laa khalaaqa lahum fil Aakhirati wa laa yukallimuhumul laahu wa laa yanzuru ilaihim Yawmal Qiyaamati wa laa yuzakkeehim wa lahum `azabun `aleem
📖 मराठी अर्थ
७७. निःसंशय, जे लोक अल्लाहशी केलेला वचन-करार आणि आपल्या शपथांना थोड्याशा किंमतीवर विकून टाकतात त्यांच्यासाठी आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह ना तर त्यांच्याशी संभाषण करील, ना कियामतच्या दिवशी त्यांच्याकडे पाहील, ना त्यांना पाक (पवित्र) करील, आणि त्यांच्यासाठी मोठा दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 75-79 — सूरा आल-इमरान

75۞ وَمِنْ أَهْلِ الْكِتَابِ مَنْ إِن تَأْمَنْهُ بِقِنطَارٍ يُؤَدِّهِ إِلَيْكَ وَمِنْهُم مَّنْ إِن تَأْمَنْهُ بِدِينَارٍ لَّا يُؤَدِّهِ إِلَيْكَ إِلَّا مَا دُمْتَ عَلَيْهِ قَائِمًا ۗ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَالُوا لَيْسَ عَلَيْنَا فِي الْأُمِّيِّينَ سَبِيلٌ وَيَقُولُونَ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُمْ يَعْلَمُونَ
७५. आणि काही ग्रंथधारक असेही आहेत की तुम्ही त्यांना खजीन्याचे विश्वस्त बनवाल तरीही तुम्हाला परत करतील आणि त्यांच्यापैकी काही असेही आहेत की जर तुम्ही त्यांना एक दिनारही ठेव म्हणून द्याल तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्या डोक्यावर उभे न राहाल तोपर्यंत तुम्हाला परत करणार नाहीत. हे अशासाठी की त्यांनी सांगून ठेवले आहे की या अशिक्षितांचा हक्क मारण्यात आमच्यावर काहीच गुन्हा नाही. हे लोक जाणून घेतल्यानंतरही अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलतात
76بَلَىٰ مَنْ أَوْفَىٰ بِعَهْدِهِ وَاتَّقَىٰ فَإِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُتَّقِينَ
७६. का नाही (पकड होईल) परंतु जो मनुष्य आपला फायदा पूर्ण करील आणि अल्लाहचे भय राखील तर अल्लाह अशा भय राखणाऱ्यांना आपला दोस्त राखतो
77إِنَّ الَّذِينَ يَشْتَرُونَ بِعَهْدِ اللَّهِ وَأَيْمَانِهِمْ ثَمَنًا قَلِيلًا أُولَٰئِكَ لَا خَلَاقَ لَهُمْ فِي الْآخِرَةِ وَلَا يُكَلِّمُهُمُ اللَّهُ وَلَا يَنظُرُ إِلَيْهِمْ يَوْمَ الْقِيَامَةِ وَلَا يُزَكِّيهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ
७७. निःसंशय, जे लोक अल्लाहशी केलेला वचन-करार आणि आपल्या शपथांना थोड्याशा किंमतीवर विकून टाकतात त्यांच्यासाठी आखिरतमध्ये काहीच हिस्सा नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह ना तर त्यांच्याशी संभाषण करील, ना कियामतच्या दिवशी त्यांच्याकडे पाहील, ना त्यांना पाक (पवित्र) करील, आणि त्यांच्यासाठी मोठा दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
78وَإِنَّ مِنْهُمْ لَفَرِيقًا يَلْوُونَ أَلْسِنَتَهُم بِالْكِتَابِ لِتَحْسَبُوهُ مِنَ الْكِتَابِ وَمَا هُوَ مِنَ الْكِتَابِ وَيَقُولُونَ هُوَ مِنْ عِندِ اللَّهِ وَمَا هُوَ مِنْ عِندِ اللَّهِ وَيَقُولُونَ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُمْ يَعْلَمُونَ
७८. निश्चितच त्यांच्यात एक समूह असाही आहे जो ग्रंथाचे वाचन करताना आपल्या जीभेला मोड देतो, यासाठी की तुम्ही त्याला ग्रंथातलाच मजकूर समजावे. वास्तविक तो ग्रंथातला मजकूर नाही आणि ते असेही म्हणतात की ते अल्लाहतर्फे आहे, वास्तविक ते अल्लाहतर्फे नाही. ते जाणूनबुजून अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलतात
79مَا كَانَ لِبَشَرٍ أَن يُؤْتِيَهُ اللَّهُ الْكِتَابَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ ثُمَّ يَقُولَ لِلنَّاسِ كُونُوا عِبَادًا لِّي مِن دُونِ اللَّهِ وَلَٰكِن كُونُوا رَبَّانِيِّينَ بِمَا كُنتُمْ تُعَلِّمُونَ الْكِتَابَ وَبِمَا كُنتُمْ تَدْرُسُونَ
७९. ज्याला अल्लाहने ग्रंथ, हिकमत (बुद्धिमानता) आणि प्रेषित्व प्रदान करावे अशा एखाद्या माणसाकरिता हे उचित नव्हे की तरीही त्याने लोकांना सांगावे की अल्लाहला सोडून माझे दास (उपासक) बना, किंबहुना तो तर असेच म्हणेल की तुम्ही सर्व लोक ‘रब’ (पालनकर्त्या) चे व्हा ज्याअर्थी तुम्ही ग्रंथ शिकविता आणि त्याचा पाठदेखील देता
आल-इमरानकुराण यादी
200आयत
MedinanRevelation
77आयत

भाषांतर — आल-इमरान 77

सूरा आल-इमरान आयत 77 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७७. निःसंशय, जे लोक अल्लाहशी केलेला वचन-करार आणि आपल्या शपथांना…

सूरा आयत 77/200 — सूरा आल-इमरान آل عمران (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा आल-इमरान ऐका, सूरा आल-इमरान भाषांतर, सूरा आल-इमरान mp3, सूरा आल-इमरान pdf. आयत 75–79. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers