PDF —
182 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अस-साफ्फात pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अस-साफ्फात pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अस-साफ्फात भाषांतर. सूरा अस-साफ्फात (Meccan) 182 आयत.

← यासीनसूरा अस-साफ्फात साद →


182 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭑﭒﭓ
37:1 १. शपथ आहे पंक्तिबद्ध होणाऱ्यां (फरिश्त्यां) ची
ﭔﭕﭖ
37:2 २. मग पूर्णतः दरडाविणाऱ्यांची
ﭗﭘﭙ
37:3 ३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची
ﭚﭛﭜﭝ
37:4 ४. निःसंशय, तुम्हा सर्वांचा उपास्य (माबूद) एकच आहे
ﭞﭟﭠﭡﭢﭣﭤﭥ
37:5 ५. आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व वस्तूंचा आणि समस्त पूर्व दिशांचा तोच स्वामी आहे
ﭦﭧﭨﭩﭪﭫﭬ
37:6 ६. आम्ही जगाच्या (जवळ असलेल्या) आकाशाला तारकांनी सजविले आणि सुशोभित केले आहे
ﭭﭮﭯﭰﭱﭲ
37:7 ७. आणि (आम्ही त्याचे) प्रत्येक विद्रोही सैतानापासून रक्षण केले आहे
ﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼ
37:8 ८. उच्च विश्वाच्या फरिश्त्यां (च्या गोष्टी) ऐकण्याकरिता ते कानही लावू शकत नाही, किंबहुना चोहीकडून त्यांच्यावर मारा होत असतो
ﭽﭾﭿﮀﮁﮂ
37:9 ९. पिटाळून लावण्याकरिता आणि त्यांच्या साठी कायमस्वरूपी अज़ाब (शिक्षा - यातना) आहे
ﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊ
37:10 १०. परंतु जो घाईगर्दीने एखादी गोष्टी हिसकावून पळेल तर (तत्क्षणी) एक धगधगता निखारा त्याच्या पाठीशी लागतो
ﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘ
37:11 ११. या काफिर लोकांना विचारा की त्यांना निर्माण करणे जास्त कठीण आहे की ज्यांना आम्ही निर्माण केले आहे? आम्ही तर मानवांना चिकण मातीपासून निर्माण केले आहे
ﮙﮚﮛﮜ
37:12 १२. किंबहुना तुम्ही आश्चर्य व्यक्त करत आहात आणि हे लोक थट्टा उडवित आहेत
ﮝﮞﮟﮠﮡ
37:13 १३. आणि जेव्हा त्यांना उपदेश केला जातो तेव्हा ते मानत नाहीत
ﮢﮣﮤﮥﮦ
37:14 १४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात
ﮧﮨﮩﮪﮫﮬﮭ
37:15 १५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे
ﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖ
37:16 १६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ
ﯗﯘﯙ
37:17 १७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही
ﯚﯛﯜﯝﯞ
37:18 १८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल
ﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦ
37:19 १९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील
ﯧﯨﯩﯪﯫﯬ
37:20 २०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे
ﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴ
37:21 २१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात
ﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽ
37:22 २२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते
ﯾﯿﰀﰁﰂﰃﰄﰅ
37:23 २३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा
ﰆﰇﰈﰉﰊ
37:24 २४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत
ﭑﭒﭓﭔﭕ
37:25 २५. (या वेळी) तुम्ही एकमेकांची मदत करीत नाहीत, याला कारण काय
ﭖﭗﭘﭙﭚ
37:26 २६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत
ﭛﭜﭝﭞﭟﭠ
37:27 २७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील
ﭡﭢﭣﭤﭥﭦﭧ
37:28 २८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत
ﭨﭩﭪﭫﭬﭭ
37:29 २९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते
ﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹ
37:30 ३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते
ﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁ
37:31 ३१. आता आम्हा (सर्वां) वर आमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान लागू झालेच आहे की आम्ही (शिक्षा-यातनाची) गोडी चाखणार आहोत
ﮂﮃﮄﮅﮆ
37:32 ३२. तेव्हा आम्ही तुम्हाला पथभ्रष्ट केले, आम्ही तर स्वतःदेखील पथभ्रष्टतेत होतो
ﮇﮈﮉﮊﮋﮌ
37:33 ३३. तेव्हा आजच्या दिवशी (सर्वच) शिक्षा यातनेचे वाटेकरी आहेत
ﮍﮎﮏﮐﮑ
37:34 ३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो
ﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜ
37:35 ३५. हे असे (लोक) आहेत की जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा हे घमेंड करीत असत
ﮝﮞﮟﮠﮡﮢﮣ
37:36 ३६. आणि म्हणत की काय आम्ही आपल्या दैवतांना एका वेड्या कवीच्या बोलण्यावरून सोडून द्यावे
ﮤﮥﮦﮧﮨﮩ
37:37 ३७. (नाही मुळीच नाही) किंबहुना पैगंबर तर सत्य (सच्चा दीन धर्म) घेऊन आले आहेत आणि सर्व पैगंबरांना खरे जाणतात
ﮪﮫﮬﮭﮮ
37:38 ३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात
ﮯﮰﮱﯓﯔﯕﯖ
37:39 ३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
ﯗﯘﯙﯚﯛ
37:40 ४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास
ﯜﯝﯞﯟﯠ
37:41 ४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे
ﯡﯢﯣﯤ
37:42 ४२. (प्रत्येक प्रकारचे) मेवे आणि ते सन्मानित आदरणीय असतील
ﯥﯦﯧﯨ
37:43 ४३. सुखांनी भरलेल्या जन्नतीमध्ये
ﯩﯪﯫﯬ
37:44 ४४. आसनांवर एकमेकांच्या समोर बसले असतील
ﯭﯮﯯﯰﯱﯲ
37:45 ४५. प्रवाहित (वाहत्या) मद्याचे प्याले त्यांच्या दरम्यान फिरत असतील
ﯳﯴﯵﯶ
37:46 ४६. जे स्वच्छ सफेद आणि प्यायला स्वादिष्ट असेल
ﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾ
37:47 ४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील
ﯿﰀﰁﰂﰃ
37:48 ४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील
ﰄﰅﰆﰇ
37:49 ४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी
ﰈﰉﰊﰋﰌﰍ
37:50 ५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील
ﰎﰏﰐﰑﰒﰓﰔﰕ
37:51 ५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता
ﭑﭒﭓﭔﭕ
37:52 ५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस
ﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝ
37:53 ५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल
ﭞﭟﭠﭡﭢ
37:54 ५४. सांगितले जाईल, तुम्ही इच्छिता की डोकावून पाहावे
ﭣﭤﭥﭦﭧﭨ
37:55 ५५. डोकावून पाहताच त्याला जहन्नममध्ये मध्यभागी (जळताना) दिसेल
ﭩﭪﭫﭬﭭﭮ
37:56 ५६. तो म्हणेल, अल्लाहची शपथ! तू तर माझाही सर्वनाश करण्याच्या जवळ होता
ﭯﭰﭱﭲﭳﭴﭵ
37:57 ५७. जर माझ्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा नसती तर मी देखील जहन्नममध्ये हजर केल्या जाणाऱ्यांपैकी असतो
ﭶﭷﭸﭹ
37:58 ५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत
ﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
37:59 ५९. पहिल्या एका मृत्युखेरीज, आणि ना आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिला जाईल
ﮁﮂﮃﮄﮅﮆ
37:60 ६०. मग तर (स्पष्ट आहे की) ही फार मोठी सफलता आहे
ﮇﮈﮉﮊﮋ
37:61 ६१. अशी (सफलता) प्राप्त करण्यासाठी आचरण करणाऱ्यांनी आचरण केले पाहिजे
ﮌﮍﮎﮏﮐﮑﮒ
37:62 ६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड
ﮓﮔﮕﮖﮗ
37:63 ६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे
ﮘﮙﮚﮛﮜﮝﮞ
37:64 ६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
ﮟﮠﮡﮢﮣ
37:65 ६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
ﮤﮥﮦﮧﮨﮩﮪ
37:66 ६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
ﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓ
37:67 ६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले
ﯔﯕﯖﯗﯘﯙ
37:68 ६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल
ﯚﯛﯜﯝﯞ
37:69 ६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले
ﯟﯠﯡﯢﯣ
37:70 ७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले
ﯤﯥﯦﯧﯨﯩ
37:71 ७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत
ﯪﯫﯬﯭﯮ
37:72 ७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते
ﯯﯰﯱﯲﯳﯴ
37:73 ७३. आता तुम्ही पाहा की ज्यांना (अल्लाहच्या अज़ाबचे) भय दाखविले गेले होते, त्यांचा शेवट कसा झाला
ﯵﯶﯷﯸﯹ
37:74 ७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
ﯺﯻﯼﯽﯾﯿ
37:75 ७५. आम्हाला नूहने पुकारले तर पाहा की आम्ही किती चांगले दुआ (प्रार्थना) कबूल करणारे आहोत
ﰀﰁﰂﰃﰄﰅ
37:76 ७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले
ﭑﭒﭓﭔﭕ
37:77 ७७. आणि त्याच्या संततीला आम्ही बाकी राहणारी बनविले
ﭖﭗﭘﭙﭚ
37:78 ७८. आणि आम्ही त्याचे स्मरण (चर्चा) नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवले
ﭛﭜﭝﭞﭟﭠ
37:79 ७९. नूह (अले.) वर साऱ्या जगात सलाम असो
ﭡﭢﭣﭤﭥ
37:80 ८०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
ﭦﭧﭨﭩﭪ
37:81 ८१. निःसंशय, तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
ﭫﭬﭭﭮ
37:82 ८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले
ﭯﭰﭱﭲﭳﭴ
37:83 ८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते
ﭵﭶﭷﭸﭹﭺ
37:84 ८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले
ﭻﭼﭽﭾﭿﮀﮁ
37:85 ८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात
ﮂﮃﮄﮅﮆﮇ
37:86 ८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता
ﮈﮉﮊﮋﮌ
37:87 ८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे
ﮍﮎﮏﮐﮑ
37:88 ८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली
ﮒﮓﮔﮕ
37:89 ८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे
ﮖﮗﮘﮙ
37:90 ९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले
ﮚﮛﮜﮝﮞﮟﮠ
37:91 ९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत
ﮡﮢﮣﮤﮥ
37:92 ९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत
ﮦﮧﮨﮩﮪ
37:93 ९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले
ﮫﮬﮭﮮ
37:94 ९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले
ﮯﮰﮱﯓﯔ
37:95 ९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता
ﯕﯖﯗﯘﯙ
37:96 ९६. वास्तविक तुम्हाला आणि तुम्ही बनविलेल्या वस्तूंना अल्लाहनेच निर्माण केले आहे
ﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡ
37:97 ९७. ते (लोक) म्हणाले, याच्यासाठी एक घर (अग्निकुंड) तयार करा आणि त्या (धगधगत्या) आगीत याला टाकून द्या
ﯢﯣﯤﯥﯦﯧ
37:98 ९८. त्यांनी तर त्याच्या (इब्राहीम) शी डाव खेळी इच्छिले, परंतु आम्ही त्यांनाच तोंडघशी पाडले
ﯨﯩﯪﯫﯬﯭﯮ
37:99 ९९. आणि (इब्राहीम) म्हणाले की मी तर (हिजरत- देशत्याग) करून आपल्या पालनर्त्याकडे जाणार आहे, तो निश्चितच मला मार्ग दाखविल
ﯯﯰﯱﯲﯳﯴ
37:100 १००. हे माझ्या पालनकर्त्या! मला नेक सदाचारी पुत्र प्रदान कर
ﯵﯶﯷﯸ
37:101 १०१. तेव्हा आम्ही त्याला एक सहनशील पुत्र (प्राप्ती) ची शुभवार्ता दिली
ﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁﰂﰃﰄﰅﰆﰇﰈﰉﰊﰋﰌﰍﰎﰏﰐﰑﰒﰓﰔﰕ
37:102 १०२. मग तेव्हा (बालक) या वयास पोहचले की त्याच्यासोबत हिंडू फिरू शकेल, तेव्हा (इब्राहीम) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! मी स्वप्नात स्वतःला तुझे बलिदान (कुर्बानी) करताना पाहत आहे. आता तूच सांग, तुझा काय विचार आहे?१ पुत्राने उत्तर दिले, हे पिता! जो आदेश (अल्लाहतर्फे) दिला जात आहे, त्याचे पालन करा. अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळेल
ﭑﭒﭓﭔﭕ
37:103 १०३. अर्थात जेव्हा दोघांनी स्वीकार केला आणि त्या (पित्या) ने त्या (पुत्रा) ला माथा टेकलेल्या अवस्थेत खाली पाडले
ﭖﭗﭘﭙ
37:104 १०४. तेव्हा आम्ही हाक मारली, हे इब्राहीम
ﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
37:105 १०५. निःसंशय, तुम्ही स्वप्नाला खरे करून दाखविले. निःसंशय, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
ﭣﭤﭥﭦﭧﭨ
37:106 १०६. वास्तविक ही उघड अशी कसोटी होती
ﭩﭪﭫﭬ
37:107 १०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२
ﭭﭮﭯﭰﭱ
37:108 १०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
ﭲﭳﭴﭵ
37:109 १०९. इब्राहीमवर सलाम असो
ﭶﭷﭸﭹ
37:110 ११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
ﭺﭻﭼﭽﭾ
37:111 १११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
ﭿﮀﮁﮂﮃﮄ
37:112 ११२. आणि आम्ही त्याला पैगंबर इसहाकचा शुभ समाचार दिला, जो नेक सदाचारी लोकांपैकी असेल
ﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐ
37:113 ११३. आणि आम्ही इब्राहीम व इसहाकवर अनेक (प्रकारची) समृद्धी अवतरित केली आणि या दोघांच्या संततीत काही तर भाग्यशाली आहेत आणि काही आपल्या प्राणांवर उघड अत्याचार करतात
ﮑﮒﮓﮔﮕﮖ
37:114 ११४. आणि निश्चितच आम्ही मूसा आणि हारूनवर मोठा उपकार केला
ﮗﮘﮙﮚﮛﮜ
37:115 ११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली
ﮝﮞﮟﮠﮡ
37:116 ११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले
ﮢﮣﮤﮥ
37:117 ११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला
ﮦﮧﮨﮩ
37:118 ११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले
ﮪﮫﮬﮭﮮ
37:119 ११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली
ﮯﮰﮱﯓﯔ
37:120 १२०. मूसा आणि हारूनवर सलाम असोे
ﯕﯖﯗﯘﯙ
37:121 १२१. निःसंशय, आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करीत असतो
ﯚﯛﯜﯝﯞ
37:122 १२२. निःसंशय, हे दोघे आमच्या ईमानधारक दासांपैकी होते
ﯟﯠﯡﯢﯣ
37:123 १२३. आणि निःसंशय, इलियास देखील पैगंबरांपैकी होते
ﯤﯥﯦﯧﯨﯩ
37:124 १२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
ﯪﯫﯬﯭﯮﯯ
37:125 १२५. काय तुम्ही (वअ्‌ल) नावाच्या मूर्तीला पुकारता आणि सर्वांत उत्तम अशा निर्माणकर्त्याला सोडून देता
ﯰﯱﯲﯳﯴﯵ
37:126 १२६. अल्लाह, जो तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व वाडवडिलांचा स्वामी व पालनकर्ता आहे
ﭑﭒﭓﭔ
37:127 १२७. परंतु जनसमूहाच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, तेव्हा ते अवश्य (शिक्षा - यातनाग्रस्त अवस्थेत) हजर केले जातील
ﭕﭖﭗﭘﭙ
37:128 १२८. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
ﭚﭛﭜﭝﭞ
37:129 १२९. आणि आम्ही (इलियासची) शुभा चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
ﭟﭠﭡﭢﭣ
37:130 १३०. इलियासवर सलाम असो
ﭤﭥﭦﭧﭨ
37:131 १३१. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
ﭩﭪﭫﭬﭭ
37:132 १३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१
ﭮﭯﭰﭱﭲ
37:133 १३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते
ﭳﭴﭵﭶﭷ
37:134 १३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली
ﭸﭹﭺﭻﭼ
37:135 १३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली
ﭽﭾﭿﮀ
37:136 १३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला
ﮁﮂﮃﮄﮅ
37:137 १३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता
ﮆﮇﮈﮉﮊ
37:138 १३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही
ﮋﮌﮍﮎﮏ
37:139 १३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते
ﮐﮑﮒﮓﮔﮕ
37:140 १४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले
ﮖﮗﮘﮙﮚ
37:141 १४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले
ﮛﮜﮝﮞﮟ
37:142 १४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले
ﮠﮡﮢﮣﮤﮥ
37:143 १४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते
ﮦﮧﮨﮩﮪﮫﮬ
37:144 १४४. तर लोकांना उठविले जाण्याच्या दिवसापर्यंत माशाच्या पोटातच राहिले असते
ﮭﮮﮯﮰﮱﯓ
37:145 १४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता
ﯔﯕﯖﯗﯘﯙ
37:146 १४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले
ﯚﯛﯜﯝﯞﯟﯠ
37:147 १४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले
ﯡﯢﯣﯤﯥ
37:148 १४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली
ﯦﯧﯨﯩﯪﯫ
37:149 १४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत
ﯬﯭﯮﯯﯰﯱﯲ
37:150 १५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले
ﯳﯴﯵﯶﯷﯸ
37:151 १५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत
ﯹﯺﯻﯼﯽ
37:152 १५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत
ﯾﯿﰀﰁﰂ
37:153 १५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले
ﭑﭒﭓﭔﭕ
37:154 १५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता
ﭖﭗﭘ
37:155 १५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही
ﭙﭚﭛﭜﭝ
37:156 १५६. किंवा तुमच्याजवळ (त्याविषयी) एखादे स्पष्ट प्रमाण आहे
ﭞﭟﭠﭡﭢﭣ
37:157 १५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या
ﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯ
37:158 १५८. आणि त्या लोकांनी तर अल्लाह आणि जिन्नांच्या दरम्यानही नाते कायम केले आहे, आणि वास्तविक जिन्न लोक स्वतः हे ज्ञान बाळगतात की ते (अशी श्रद्धा राखणारे अज़ाबच्या समोर) प्रस्तुत केले जातील
ﭰﭱﭲﭳﭴ
37:159 १५९. हे, जे काही (अल्लाहविषयी) सांगत आहेत, त्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाह पवित्र (अलिप्त) आहे
ﭵﭶﭷﭸﭹ
37:160 १६०. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
ﭺﭻﭼﭽ
37:161 १६१. विश्वास करा की तुम्ही सर्व आणि तुमची (खोटी) उपास्ये
ﭾﭿﮀﮁﮂ
37:162 १६२. कोणा एकालाही बहकवू शकत नाही
ﮃﮄﮅﮆﮇﮈ
37:163 १६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत
ﮉﮊﮋﮌﮍﮎﮏ
37:164 १६४. (फरिश्त्यांचे कथन आहे) की आमच्यापैकी प्रत्येकाचे स्थान निर्धारित आहे
ﮐﮑﮒﮓ
37:165 १६५. आणि आम्ही (अल्लाहच्या आज्ञापालनात) पंक्तिबद्ध (रांगांनी) उभे आहोत
ﮔﮕﮖﮗ
37:166 १६६. आणि त्याची तस्बीह (पावित्र्यगान) करीत आहोत
ﮘﮙﮚﮛ
37:167 १६७. आणि काफिर तर म्हणत असत
ﮜﮝﮞﮟﮠﮡﮢ
37:168 १६८. की जर आमच्याजवळ पूर्वीच्या लोकांची स्मृती असती
ﮣﮤﮥﮦﮧ
37:169 १६९. तर आम्ही देखील अल्लाहचे निवडक दास बनलो असतो
ﮨﮩﮪﮫﮬﮭ
37:170 १७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल
ﮮﮯﮰﮱﯓﯔ
37:171 १७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे
ﯕﯖﯗﯘ
37:172 १७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल
ﯙﯚﯛﯜﯝ
37:173 १७३. आणि आमचे सैन्य वर्चस्वशाली (आणि श्रेष्ठतम) राहील
ﯞﯟﯠﯡﯢ
37:174 १७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या
ﯣﯤﯥﯦ
37:175 १७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील
ﯧﯨﯩ
37:176 १७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)
ﯪﯫﯬﯭﯮﯯﯰ
37:177 १७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
ﯱﯲﯳﯴﯵ
37:178 १७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
ﯶﯷﯸﯹ
37:179 १७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील
ﯺﯻﯼﯽﯾﯿﰀ
37:180 १८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात
ﰁﰂﰃﰄ
37:181 १८१. आणि पैगंबरांवर सलाम आहे
ﰅﰆﰇﰈﰉ
37:182 १८२. आणि समस्त प्रशंसा, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहकरिता आहे

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers