अल-कसस · 33/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
قَالَ رَبِّ إِنِّي قَتَلْتُ مِنْهُمْ نَفْسًا فَأَخَافُ أَن يَقْتُلُونِ ۝٣٣
Qaala Rabbi innee qataltu minhum nafsan fa akhaafu ai yaqtuloon
📖 मराठी अर्थ
३३. (मूसा अलै.) म्हणाले, हे पालनकर्त्या! मी त्यांच्या एका माणसाची हत्या केली होती. आता मला भय वाटते की तेही मला ठार करतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 31-35 — सूरा अल-कसस

31وَأَنْ أَلْقِ عَصَاكَ ۖ فَلَمَّا رَآهَا تَهْتَزُّ كَأَنَّهَا جَانٌّ وَلَّىٰ مُدْبِرًا وَلَمْ يُعَقِّبْ ۚ يَا مُوسَىٰ أَقْبِلْ وَلَا تَخَفْ ۖ إِنَّكَ مِنَ الْآمِنِينَ
३१. आणि हे की आपली काठी खाली टाका. मग जेव्हा तिला पाहिले, ती सापासारखी वळवळ करीत आहे तेव्हा पाठ फिरवून परतले आणि मागे वळून तोंडही दाखवले नाही. आम्ही फर्माविले, हे मूसा! पुढे या. भयभीत होऊ नका. निःसंशय, तुम्ही सर्व प्रकारे अगदी सुरक्षित आहात
32اسْلُكْ يَدَكَ فِي جَيْبِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ وَاضْمُمْ إِلَيْكَ جَنَاحَكَ مِنَ الرَّهْبِ ۖ فَذَانِكَ بُرْهَانَانِ مِن رَّبِّكَ إِلَىٰ فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ
३२. आपला हात आपल्या खिशात घाला, तो कसल्याही प्रकारच्या डागाविना पूर्ण शुभ्र चकाकणारा होऊन बाहेर निघेल आणि भय- दहशतीपासून आपला बचाव करण्याकरिता आपली भुजा आपल्याशी समेटून घ्या. हे दोन चमत्कार (मोजिजे) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहेत, फिरऔन आणि त्याच्या समूहाकडे (प्रस्तुत करण्यासाठी). निःसंशय, ते सर्वच्या सर्व अवज्ञा करणारे दुराचारी लोक आहेत
33قَالَ رَبِّ إِنِّي قَتَلْتُ مِنْهُمْ نَفْسًا فَأَخَافُ أَن يَقْتُلُونِ
३३. (मूसा अलै.) म्हणाले, हे पालनकर्त्या! मी त्यांच्या एका माणसाची हत्या केली होती. आता मला भय वाटते की तेही मला ठार करतील
34وَأَخِي هَارُونُ هُوَ أَفْصَحُ مِنِّي لِسَانًا فَأَرْسِلْهُ مَعِيَ رِدْءًا يُصَدِّقُنِي ۖ إِنِّي أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ
३४. आणि माझा भाऊ हारुन माझ्यापेक्षा अधिक साफ बोलणारा आहे. तू त्याला देखील माझा सहाय्यक बनवून माझ्यासोबत पाठव, यासाठी की त्याने मला खरे मानावे. मला तर भीती वाटते की ते सर्व मला खोटे ठरवतील
35قَالَ سَنَشُدُّ عَضُدَكَ بِأَخِيكَ وَنَجْعَلُ لَكُمَا سُلْطَانًا فَلَا يَصِلُونَ إِلَيْكُمَا ۚ بِآيَاتِنَا أَنتُمَا وَمَنِ اتَّبَعَكُمَا الْغَالِبُونَ
३५. (अल्लाहने) फर्माविले, आम्ही तुमच्या बंधुद्वारे तुम्हाला मजबूत बाजू प्रदान करू आणि तुम्हा दोघांना वर्चस्वशाली करू, तेव्हा फिरऔनचे लोक तुमच्यापर्यंत पोहचूच शकणार नाहीत. आमच्या निशाण्यांमुळे तुम्ही दोघे आणि तुमचे अनुयायीच सफल ठरतील
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-कसस 33

सूरा अल-कसस आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. (मूसा अलै.) म्हणाले, हे पालनकर्त्या! मी त्यांच्या एका माणसाची…

सूरा आयत 33/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers