बनी इस्राईल · 82/111
भाषांतर उच्चार — बनी इस्राईल
وَنُنَزِّلُ مِنَ الْقُرْآنِ مَا هُوَ شِفَاءٌ وَرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِينَ ۙ وَلَا يَزِيدُ الظَّالِمِينَ إِلَّا خَسَارًا ۝٨٢
Wa nunazzilu minal quraani maa huwa shifaaa`unw wa rahmatul lilmu;mineena wa laa yazeeduz zaalimeena illaa khasaaraa
📖 मराठी अर्थ
८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही
🎧 ऐका

📜 आयत 80-84 — बनी इस्राईल

80وَقُل رَّبِّ أَدْخِلْنِي مُدْخَلَ صِدْقٍ وَأَخْرِجْنِي مُخْرَجَ صِدْقٍ وَاجْعَل لِّي مِن لَّدُنكَ سُلْطَانًا نَّصِيرًا
८०. आणि दुआ-प्रार्थना करीत राहा की हे माझ्या पालनकर्त्या! मला जिथेही न्यायचे असेल, चांगल्या प्रकारे ने आणि जिथूनही बाहेर काढायचे असेल चांगल्या प्रकारे काढआणि माझ्यासाठी आपल्या जवळून वर्चस्व आणि मदत निश्चित कर
81وَقُلْ جَاءَ الْحَقُّ وَزَهَقَ الْبَاطِلُ ۚ إِنَّ الْبَاطِلَ كَانَ زَهُوقًا
८१. आणि या गोष्टीचे ऐलान करा की, सत्य येऊन पोहोचले आणि असत्य मिटले. निःसंशय असत्य मिटण्याच्याच योग्य होते
82وَنُنَزِّلُ مِنَ الْقُرْآنِ مَا هُوَ شِفَاءٌ وَرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِينَ ۙ وَلَا يَزِيدُ الظَّالِمِينَ إِلَّا خَسَارًا
८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही
83وَإِذَا أَنْعَمْنَا عَلَى الْإِنسَانِ أَعْرَضَ وَنَأَىٰ بِجَانِبِهِ ۖ وَإِذَا مَسَّهُ الشَّرُّ كَانَ يَئُوسًا
८३. आणि जेव्हा देखील माणसाला आम्ही आपली कृपा-देणगी प्रदान करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि कुशी बदलतो आणि जेव्हा देखील त्याला दुःख पोहोचते तेव्हा तो निराश होतो
84قُلْ كُلٌّ يَعْمَلُ عَلَىٰ شَاكِلَتِهِ فَرَبُّكُمْ أَعْلَمُ بِمَنْ هُوَ أَهْدَىٰ سَبِيلًا
८४. सांगा की प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीनुसार कार्य करतो. जे पूर्णतः मार्गदर्शनावर आहेत, त्यांना तुमचा पालनकर्ताच चांगल्या प्रकारे जाणतो
बनी इस्राईलकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
82आयत

भाषांतर — बनी इस्राईल 82

सूरा बनी इस्राईल आयत 82 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान…

सूरा आयत 82/111 — बनी इस्राईल الإسراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: बनी इस्राईल ऐका, बनी इस्राईल भाषांतर, बनी इस्राईल mp3, बनी इस्राईल pdf. आयत 80–84. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers