आल-इमरान · 60/200
भाषांतर उच्चार — आल-इमरान
الْحَقُّ مِن رَّبِّكَ فَلَا تَكُن مِّنَ الْمُمْتَرِينَ ۝٦٠
Alhaqqu mir Rabbika falaa takum minal mumtareen
📖 मराठी अर्थ
६०. तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य हेच आहे, खबरदार! शंका-संवशय धरणाऱ्यांपैकी होऊ नका
🎧 ऐका

📜 आयत 58-62 — आल-इमरान

58ذَٰلِكَ نَتْلُوهُ عَلَيْكَ مِنَ الْآيَاتِ وَالذِّكْرِ الْحَكِيمِ
५८. हे जे आम्ही तुम्हाला वाचून ऐकिवत आहोत, आयती आहेत आणि बोध-पत्र आहे (हिकमतीने पूर्ण असा संदेश आहे)
59إِنَّ مَثَلَ عِيسَىٰ عِندَ اللَّهِ كَمَثَلِ آدَمَ ۖ خَلَقَهُ مِن تُرَابٍ ثُمَّ قَالَ لَهُ كُن فَيَكُونُ
५९. अल्लाहजवळ ईसाचे उदाहरण आदमसारखे आहे, ज्याला मातीद्वार निर्माण करून फर्माविले, ‘‘होऊन जा’’ बस तो घडून आला
60الْحَقُّ مِن رَّبِّكَ فَلَا تَكُن مِّنَ الْمُمْتَرِينَ
६०. तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य हेच आहे, खबरदार! शंका-संवशय धरणाऱ्यांपैकी होऊ नका
61فَمَنْ حَاجَّكَ فِيهِ مِن بَعْدِ مَا جَاءَكَ مِنَ الْعِلْمِ فَقُلْ تَعَالَوْا نَدْعُ أَبْنَاءَنَا وَأَبْنَاءَكُمْ وَنِسَاءَنَا وَنِسَاءَكُمْ وَأَنفُسَنَا وَأَنفُسَكُمْ ثُمَّ نَبْتَهِلْ فَنَجْعَل لَّعْنَتَ اللَّهِ عَلَى الْكَاذِبِينَ
६१. यास्तव जो कोणी, तुमच्याजवळ हे ज्ञान येऊन पोहोचल्यानंतरही तुमच्याशी याबाबत वाद घालील तर तुम्ही सांगा की या आम्ही आणि तुम्ही आपापल्या पुत्रांना आणि आम्ही व तुम्ही आपापल्या पत्नींना आणि आम्ही व तुम्ही स्वतः आपल्याला बोलावून घेऊ, मग आम्ही सर्व मिळून दुआ (प्रार्थना) करू या आणि खोट्या लोकांवर अल्लाहचा धिःक्कार पाठवू या
62إِنَّ هَٰذَا لَهُوَ الْقَصَصُ الْحَقُّ ۚ وَمَا مِنْ إِلَٰهٍ إِلَّا اللَّهُ ۚ وَإِنَّ اللَّهَ لَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ
६२. निःसंशय, हेच सत्य निवेदन आहे आणि अल्लाहशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास योग्य नाही आणि निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि हिकमतशाली आहे
आल-इमरानकुराण यादी
200आयत
MedinanRevelation
60आयत

भाषांतर — आल-इमरान 60

सूरा आल-इमरान आयत 60 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६०. तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य हेच आहे, खबरदार! शंका-संवशय धरणाऱ्यांपैकी होऊ…

सूरा आयत 60/200 — आल-इमरान آل عمران (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: आल-इमरान ऐका, आल-इमरान भाषांतर, आल-इमरान mp3, आल-इमरान pdf. आयत 58–62. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers