मुहम्मद · 18/38
भाषांतर उच्चार — सूरा मुहम्मद
فَهَلْ يَنظُرُونَ إِلَّا السَّاعَةَ أَن تَأْتِيَهُم بَغْتَةً ۖ فَقَدْ جَاءَ أَشْرَاطُهَا ۚ فَأَنَّىٰ لَهُمْ إِذَا جَاءَتْهُمْ ذِكْرَاهُمْ ۝١٨
Fahal yanzuroona illas Saa`ata an taatiyahum baghtatan faqad jaaa`a ashraatuhaa; fa-annnaa lahum izaa jaaa`at hum zikraahum
📖 मराठी अर्थ
१८. तर काय हे लोक कयामतची प्रतीक्षा करीत आहेत की ती त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहचावी. निःसंशय, तिची लक्षणे तर जाहीर झाली आहेत, मग जेव्हा कयामत त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल, तेव्हा त्यांच्यासाठी बोध प्राप्त करण्याची संधी कोठे बाकी राहील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा मुहम्मद

16وَمِنْهُم مَّن يَسْتَمِعُ إِلَيْكَ حَتَّىٰ إِذَا خَرَجُوا مِنْ عِندِكَ قَالُوا لِلَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ مَاذَا قَالَ آنِفًا ۚ أُولَٰئِكَ الَّذِينَ طَبَعَ اللَّهُ عَلَىٰ قُلُوبِهِمْ وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ
१६. आणि त्यांच्यापैकी काही (असेही आहेत की) जे तुमच्याकडे कान लावतात येथेपर्यंत की जेव्हा तुमच्या जवळून जातात, तेव्हा ज्ञान बाळगणाऱ्यांना (सुस्ती आणि बावळटपणे) विचारतात की त्याने (पैगंबराने) आता एवढ्यात काय सांगितले होते? हेच लोक होत, ज्यांच्या हृदयांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि ते आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करतात
17وَالَّذِينَ اهْتَدَوْا زَادَهُمْ هُدًى وَآتَاهُمْ تَقْوَاهُمْ
१७. आणि ज्या लोकांनी सन्मार्ग प्राप्त करून घेतला आहे, अल्लाहने त्यांच्या मार्गदर्शनात आणखी वाढ केली आहे, आणि त्यांना त्यांचा सदाचार प्रदान केला आहे
18فَهَلْ يَنظُرُونَ إِلَّا السَّاعَةَ أَن تَأْتِيَهُم بَغْتَةً ۖ فَقَدْ جَاءَ أَشْرَاطُهَا ۚ فَأَنَّىٰ لَهُمْ إِذَا جَاءَتْهُمْ ذِكْرَاهُمْ
१८. तर काय हे लोक कयामतची प्रतीक्षा करीत आहेत की ती त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहचावी. निःसंशय, तिची लक्षणे तर जाहीर झाली आहेत, मग जेव्हा कयामत त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल, तेव्हा त्यांच्यासाठी बोध प्राप्त करण्याची संधी कोठे बाकी राहील
19فَاعْلَمْ أَنَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا اللَّهُ وَاسْتَغْفِرْ لِذَنبِكَ وَلِلْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ مُتَقَلَّبَكُمْ وَمَثْوَاكُمْ
१९. तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही खात्री बाळगा की अल्लाहखेरीज दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही, आणि आपल्या अपराधांची माफी मागत राहा आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांकरिता व ईमान राखणाऱ्या स्त्रियांकरिताही१ अल्लाह तुमच्या येण्या-जाण्याच्या व निवासाच्या ठिकाणास चांगल्या प्रकारे जाणतो
20وَيَقُولُ الَّذِينَ آمَنُوا لَوْلَا نُزِّلَتْ سُورَةٌ ۖ فَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ مُّحْكَمَةٌ وَذُكِرَ فِيهَا الْقِتَالُ ۙ رَأَيْتَ الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ يَنظُرُونَ إِلَيْكَ نَظَرَ الْمَغْشِيِّ عَلَيْهِ مِنَ الْمَوْتِ ۖ فَأَوْلَىٰ لَهُمْ
२०. आणि ज्यांनी ईमान राखले ते म्हणतात की एखादी सूरह (अध्याय) का नाही अवतरित केली गेली, मग जेव्हा एखादी स्पष्ट अर्थाची सूरह अवतरित केली जाते आणि तिच्यात जिहादचा उल्लेख केला जातो, तेव्हा तुम्ही पाहता की ज्यांच्या मनात रोग आहे, ते तुमच्याकडे अशा प्रकारे पाहतात जसे तो मनुष्य पाहतो, जो मृत्युने मूर्छित झाला असेल. तेव्हा फार चांगले होते त्यांच्याकरिता
मुहम्मदकुराण यादी
38आयत
MedinanRevelation
18आयत

भाषांतर — मुहम्मद 18

सूरा मुहम्मद आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. तर काय हे लोक कयामतची प्रतीक्षा करीत आहेत की…

सूरा आयत 18/38 — सूरा मुहम्मद محمد (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा मुहम्मद ऐका, सूरा मुहम्मद भाषांतर, सूरा मुहम्मद mp3, सूरा मुहम्मद pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers