अल-माइदा · 59/120
भाषांतर उच्चार — अल-माइदा
قُلْ يَا أَهْلَ الْكِتَابِ هَلْ تَنقِمُونَ مِنَّا إِلَّا أَنْ آمَنَّا بِاللَّهِ وَمَا أُنزِلَ إِلَيْنَا وَمَا أُنزِلَ مِن قَبْلُ وَأَنَّ أَكْثَرَكُمْ فَاسِقُونَ ۝٥٩
Qul yaaa Ahlal Kitaabi hal tanqimoona minnaaa illaaa an aamannaa billaahi wa maaa unzila ilainaa wa maa unzila min qablu wa annna aksarakum faasiqoon
📖 मराठी अर्थ
५९. तुम्ही सांगा, हे यहूद्यांनो आणि ख्रिश्चनांनो! तुम्ही आमच्याशी केवळ या कारणास्तव वैर राखता की आम्ही अल्लाहवर आणि जे काही आमच्याकडे उतरविले गेले आहे आणि जे काही यापूर्वी उतरविले गेले आहे त्यावर ईमान राखले आहे आणि यासाठीही की तुमच्यात अधिकांश लोक दुराचारी आहेत

🎧 ऐका


📜 आयत 57-61 — अल-माइदा

57يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَتَّخِذُوا الَّذِينَ اتَّخَذُوا دِينَكُمْ هُزُوًا وَلَعِبًا مِّنَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ مِن قَبْلِكُمْ وَالْكُفَّارَ أَوْلِيَاءَ ۚ وَاتَّقُوا اللَّهَ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ
५७. (ईमानधारकांनो!) तुम्ही अशा लोकांना आपला मित्र बनवू नका, जे तुमच्या दीन-धर्माला खेळ-तमाशा बनवून थट्टा उडवितात, मग ते त्यांच्यापैकी असोत ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला किंवा काफिर (इन्कारी) असोत जर तुम्ही (खरोखर) ईमानधारक असाल तर अल्लाहचे भय बाळगून राहा
58وَإِذَا نَادَيْتُمْ إِلَى الصَّلَاةِ اتَّخَذُوهَا هُزُوًا وَلَعِبًا ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَعْقِلُونَ
५८. आणि जेव्हा तुम्ही नमाजकरिता (अजान) पुकारता तेव्हा ते त्यास खेळ-तमाशा ठरवितात, हे अशासाठी की ते अक्कल बाळगत नाहीत
59قُلْ يَا أَهْلَ الْكِتَابِ هَلْ تَنقِمُونَ مِنَّا إِلَّا أَنْ آمَنَّا بِاللَّهِ وَمَا أُنزِلَ إِلَيْنَا وَمَا أُنزِلَ مِن قَبْلُ وَأَنَّ أَكْثَرَكُمْ فَاسِقُونَ
५९. तुम्ही सांगा, हे यहूद्यांनो आणि ख्रिश्चनांनो! तुम्ही आमच्याशी केवळ या कारणास्तव वैर राखता की आम्ही अल्लाहवर आणि जे काही आमच्याकडे उतरविले गेले आहे आणि जे काही यापूर्वी उतरविले गेले आहे त्यावर ईमान राखले आहे आणि यासाठीही की तुमच्यात अधिकांश लोक दुराचारी आहेत
60قُلْ هَلْ أُنَبِّئُكُم بِشَرٍّ مِّن ذَٰلِكَ مَثُوبَةً عِندَ اللَّهِ ۚ مَن لَّعَنَهُ اللَّهُ وَغَضِبَ عَلَيْهِ وَجَعَلَ مِنْهُمُ الْقِرَدَةَ وَالْخَنَازِيرَ وَعَبَدَ الطَّاغُوتَ ۚ أُولَٰئِكَ شَرٌّ مَّكَانًا وَأَضَلُّ عَن سَوَاءِ السَّبِيلِ
६०. तुम्ही सांगा की काय मी तुम्हाला सांगू की याहून जास्त वाईट मोबदला प्राप्त करणारा अल्लाहच्या जवळ कोण आहे? तो, ज्याचा सर्वश्रेष्ठ अल्लाहने धिःक्कार केला असेल आणि त्यावर क्रोधित झाला असेल आणि त्यांच्यापैकी काहींना वानर आणि डुक्कर बनविले आणि ज्यांनी खोट्या दैवतांची उपासना केली तर हेच लोक वाईट दर्जाचे आहेत आणि हेच सत्य-मार्गापासून फार जास्त भटकलेले आहेत
61وَإِذَا جَاءُوكُمْ قَالُوا آمَنَّا وَقَد دَّخَلُوا بِالْكُفْرِ وَهُمْ قَدْ خَرَجُوا بِهِ ۚ وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا كَانُوا يَكْتُمُونَ
६१. आणि जेव्हा ते तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही ईमान राखले जरी ते इन्कार सोबत घेऊन आले होते आणि त्याच इन्कारासोबत (या जगातून) गेलेतही आणि हे जे काही लपवित आहेत, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
अल-माइदाकुराण यादी
120आयत
MedinanRevelation
59आयत

भाषांतर — अल-माइदा 59

सूरा अल-माइदा आयत 59 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५९. तुम्ही सांगा, हे यहूद्यांनो आणि ख्रिश्चनांनो! तुम्ही आमच्याशी केवळ…

सूरा आयत 59/120 — अल-माइदा المائدة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-माइदा ऐका, अल-माइदा भाषांतर, अल-माइदा mp3, अल-माइदा pdf. आयत 57–61. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers